Headlines

‘डिजिटल वारी’चा उत्साह, तरुणाईसह लहानांत क्रेझ:सोशल मीडियावर तुळशीमाळ अन् धोती-कुर्ता अन् नऊवारीला पसंती




यंदा आषाढी एकादशीचा उत्साह केवळ विठ्ठल मंदिरांपुरता मर्यादित न राहता, सोशल मीडियाच्या ‘डिजिटल विश्वात’ही मोठ्या उत्साहात पाहायला मिळत आहे. भक्तिमय वातावरणात पारंपरिक पोशाख परिधान करून सोशल मिडियावर ‘डिजिटल वारी’ साजरी करण्याकडे तरुणाईसह लहानांचा मोठा कल दिसून येत आहे. सोशल मिडियावर पारंपरिक पोशाखातील फोटो, आकर्षक रील्स आणि व्हिडियो अपलोड करून ‘विठू नामाचा’ गजर करण्याची नवी शैली यंदा विशेष लोकप्रिय ठरत आहे. प्रत्यक्ष दर्शनासोबतच स्टेटस आणि रील्सद्वारे भावना व्यक्त करत अहिल्यानगरकरांनी यंदाची आषाढी एकादशी डिजिटल आणि पारंपरिक अशा दोन्ही रूपांत धुमधडाक्यात साजरी करण्याची तयारी केली आहे. वारकरी पोशाखांना मोठी मागणी आषाढीनिमित्त शहरातील बाजारपेठांमध्ये पारंपरिक वारकरी वेशभूषा खरेदीसाठी गर्दी होत आहे. लहान मुलांसाठी धोती-कुर्ता, तुळशीची माळ, डोक्यावर गांधी टोपी किंवा फेटा आणि महिलांसाठी नऊवारी साडीला मोठी पसंती मिळत आहे. शाळा-कॉलेजमधील दिंडी सोहळे आणि सोसायट्यांमधील कार्यक्रमांसाठी नागरिक वारकरी पोशाख आणि विशेष रांगोळ्यांची तयारी करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *