![]()
शासनाच्या सर्व सेवा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत असून, यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. शासनाच्या विविध योजना सर्वांसाठी असून, ज्या योजनेसाठी आपण पात्र आहोत त्या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा. महसूल विभागातील कर्मचार
.
तालुक्यातील नवी बेज येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज गाव भेट समाधान शिबिरात ते बोलत होते. यावेळी विविध योजनांतील १०० लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे तसेच कृषी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कृषी अधिकारी वाल्मिक प्रकाश, नायब तहसीलदार प्रज्ञा हिरे, देविदास पवार, धनंजय पवार, अशोक पवार व ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.
शिबिरामध्ये शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र तयार करून घ्यावे, नागरिकांनी आरोग्य कार्ड काढावे तसेच शिधापत्रिका अद्ययावत करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. शेती अकृषिक करण्यासाठी आवश्यक सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल. तसेच कोणतीही अडचण असल्यास तालुका प्रशासनाला कळवावे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही पुन्हा गावात येऊ, असे कृषी अधिकारी वाल्मिक प्रकाश यांनी सांगितले. गावातील शिक्षण व आरोग्य विभागाने शासनाच्या ‘माझे गाव निरोगी’ या योजनेत प्रत्येक गावाचा सहभाग वाढवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. शिबिरामध्ये ७/१२, ८ अ उतारे, फेरफार निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र, डिजिटल ७/१२ सेवा, ई-मोजणी, पीएम किसान, अॅग्रीस्टॅक आदी सेवा नागरिकांना देण्यात आल्या.
प्रशासनातर्फे या बाबी प्रामुख्याने राबविण्यात येणार सन २००९ ते २०११ दरम्यान बांधलेली ९०० स्वेअर फूट घरे कायम करणार. पाणंद रस्ते खुले करणार. रेशनकार्ड, सातबारा उतारे, मोजणी प्रकरणे आदी तत्काळ मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार. आरटीई अंतर्गत योजनेसाठी करण्यात आलेल्या नाममात्र भाडे करारनाम्यांची चौकशी करून वंचित लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी योग्य कारवाई करणार.