![]()
राज्याचे कामगार मंत्री आकाश पांडुरंग फुंडकर यांनी बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. यासोबतच त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले असून, स्वस्त प्रसिद्धीसाठी बेताल वक्तव्ये करणाऱ्या विरोधकांना थेट ‘डोके तपासून घेण्याचा सल्लाही दिला आहे. “काँग्रेसने ‘वंदे मातरम’चा राजकीय वापर केला” काँग्रेस पक्षाच्या धोरणांवर सडकून टीका करताना फुंडकर म्हणाले की, “तुम्ही जर काँग्रेसचा इतिहास पाहिला, तर त्यांनी नेहमीच ‘वंदे मातरम’ आणि राष्ट्रीय गीताचा वापर केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी केल्याचे दिसून येते. आता मात्र त्यांचे खरे हेतू आणि खरा चेहरा सर्वांसमोर उघड झाला असून, संपूर्ण देश त्यांच्या या कृतीचा तीव्र निषेध करत आहे.” याउलट, भारतीय जनता पक्ष हा खऱ्या अर्थाने देशभक्त पक्ष असून, भारतमातेला सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी आणि समाजातील अत्यंत उपेक्षित, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजप सातत्याने काम करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “ट्रम्प भारताकडून शिकत असतील, तर ही चांगलीच गोष्ट” जागतिक पातळीवर भारताच्या वाढत्या प्रभावावर बोलताना फुंडकरांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा संदर्भ दिला. “डोनाल्ड ट्रम्प भारताकडून काहीतरी शिकत असतील, तर ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि त्यांनी लवकर शिकायला हवे. आज भारत हा असा एकमेव देश आहे, जो संपूर्ण जगाला योग्य दिशा दाखवू शकतो. त्यामुळे जगातील सर्वच देशांनी भारताकडून काहीतरी शिकले पाहिजे,” असा अभिमान त्यांनी व्यक्त केला. विरोधकांना लगावला टोला यावेळी फुंडकर यांनी नाव न घेता बेताल वक्तव्ये करणाऱ्यांवरही जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, “जे लोक अशा प्रकारचे दावे किंवा वक्तव्ये करतात, त्यांनी आधी आपली मानसिक स्थिती तपासून घेण्याची गरज आहे. हे लोक केवळ स्वस्त प्रसिद्धीसाठी हपापलेले आहेत आणि नेहमी मीडियाच्या चर्चेत राहण्यासाठीच अशी विधाने करत असतात. मी त्यांना शुभेच्छा देतो; पण त्यांनी एखाद्या चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपली मानसिकता तपासून घेतली पाहिजे.” हेही वाचा.. नगरविकास खात्याच्या कारभारावर मुंबई महापालिकेचा आक्षेप: एसआरएकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचा अश्विनी भिडे यांचा आरोप
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याच्या कारभारावर आता थेट मुंबई महापालिकेकडूनच आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी नगरविकास विभागाला थेट पत्र पाठवून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कारभारावर बोट ठेवले आहे. महापालिका आयुक्तांच्या या पत्रामुळे सध्या मंत्रालयात आणि राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. सविस्तर वाचा
Source link
काँग्रेसचा खरा चेहरा उघड, ट्रम्प यांनी भारताकडून शिकावे:मंत्री आकाश फुंडकरांची बुलढाण्यात चौफेर फटकेबाजी