Headlines

कांद्याला मिळाला फक्त 125 रुपयांचा भाव:शेतकऱ्यांचा रस्त्यावर कांदे फेकून रास्ता रोको, गंगापूर बाजार समितीत भाडे, हमाली-आडतीचा खर्च न निघाल्याने शेतकरी संतप्त‎



गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये कांद्याला १२५ ते १३० रुपयांचा भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यांनी कांद्याने भरलेला टेम्पो मुख्य रस्त्यावर आणला. सर्व कांदा फेकून रास्ता रोको आंदोलन केले. अर्धा तास महामार्गावरील वाहतूक

.

सोमवारी दुपारी गणेश बदामराव हिवाळे व लक्ष्मण दुशिंग (रा. नरहरी रांजणगाव) या शेतकऱ्यांनी टेम्पोमध्ये भरून १५ ते १७ क्विंटल कांदा विक्रीसाठी आणला होता. लिलावामध्ये त्यांच्या कांद्याला १२५ व १३० रुपये भाव मिळाला. त्यानुसार त्याची १७०० ते १८०० रुपयांची पट्टी झाली. वास्तविक टेम्पो भाडे १५०० होते. आडत-हमाली गेल्यानंतर त्यांच्या हातात काहीच उरत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर दोन्ही शेतकरी संतप्त झाले. त्यांनी टेम्पो सरळ बाजार समिती गेटसमोर नेला. गंगापूर-वैजापूर रस्त्यावर त्यातील कांदा टाकला. सरकार व बाजार समितीविरोधात घोषणाबाजी केली. परिसरातील शेतकरीही जमा झाले. त्यांनी साथ देत रास्ता रोको आंदोलन केले. दोन्ही बाजूंनी अर्धा किमी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिस व बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांची समजूत काढली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *