Headlines

काॅर्पोरेट जिहाद:निदाचा आश्रयदाता एमआयएमच्या मतीन पटेलच्या 3 मालमत्तांवर फिरणार बुलडोझर




नाशिकच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणात फरार निदा खानला एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलने स्वत:च्या नारेगाव येथील कौसर पार्क भागातील घरात आश्रय दिला होता. त्याने अतिक्रमण करून हे घर बांधले होते. याशिवाय त्याचे बिस्मिल्ला कॉलनीतील दुसरे घर, मुख्य रस्त्यावरील कार्यालयही अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याच्या या मालमत्तांना मनपाने कारणे दाखवा नोटीस चिटकवली आहे. तीन दिवसात समाधानकारक खुलासा न केल्यास बुलडोझर चालवले जाणार आहे. गुन्हेगाराला आश्रय देणाऱ्या मतीनला सहआरोपी करण्यात आले आहे. दरम्यान, एआयएमचे सर्वेसर्वो ओवेसी यांनी निदा खान, मतीन पटेलची पाठराखण केली. बुरखा अन् धार्मिक पुस्तके बाळगणे गुन्हा कधीपासून झाला? : ओवेसी ओवेसी पत्रकार परिषदेत म्हणाले की, टीसीएस प्रकरणाला एमआयएमशी जोडणे चुकीचे आहे. सुशिक्षित मुस्लिम मुलामुलींना त्रास देण्यासाठी हा कट आहे. निदाचा एचआर विभागाशी कोणताही संबंध नव्हता, असे टीसीएसच्या निवेदनात सांगण्यात आले आहे. या प्रकरणातील तक्रारदार हा सत्ताधारी राजकीय पक्षाशी संबंधित आहे. निदाच्या घरातून बुरखा, नकाब, पैगंबर मोहम्मद यांचे पुस्तक जप्त झाले. धर्माचे पुस्तक बाळगत असेल तर ते बेकायदेशीर कसे ठरू शकते? न्यायालयात निदा निर्दोष मुक्त होईल, असेही ते म्हणाले. दमदाटीचा वचपा काढण्याची संधी गेल्या महिन्यात शहागंजातील अतिक्रमण विरोधी पथकाला मतीनने दमदाटी केली होती. त्यावेळी गुन्हा दाखल झाल्यावरही त्याची अरेरावी थांबली नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी त्याचा वचपा काढण्यासाठी संधीची वाट पाहत होते. निदा खान प्रकरणाने मनपाला मतीनच्याच अनधिकृत, अतिक्रमित मालमत्ता जमीनदोस्त करण्याचे निमित्त मिळाले. म्हणूनच त्याला तातडीने नोटीस बजावण्यात आल्याची चर्चा आहे. मतीन कोर्टात सामना करेल… ओवेसींनी सांगितले की, कोर्टात या प्रकरणाचा मतीन पटेल सामना करेल. यात हैराण होण्यासारखे काहीही नाही. कायदा आपले काम करेल. दरम्यान, ओवेसींच्या स्वागतासाठी लागलेल्या बॅनरवर मतीनसोबत त्याचे मेहुणे रहीम पटेल यांचाही फोटो, नाव आहे. अटकेत असतानाही त्याचे असे बॅनर लागल्याने चर्चांना उधाण आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *