![]()
कुणी म्हणतंय एवढीशी म्हैस कशी असेल, तर कुणी तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी उत्सुक! कोळपेवाडी येथील कर्मवीर कृषी महोत्सवात यंदा अडीच फुटांच्या गिनीज रेकॉर्डधारी म्हशीने धुमाकूळ घातला आहे. शेतीची आधुनिक अवजारे, नवनवीन यंत्रे आणि तंत्रज्ञानाचे प्रदर्शन प
.
कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त या कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील माळवाडी येथील शेतकरी अनिकेत त्र्यंबक बोराटे आपली ही म्हैस घेऊन महोत्सवात दाखल झाले आहेत.
या म्हशीची उंची अवघी अडीच फूट म्हणजेच सुमारे ७६ सेंटीमीटर आहे. जगातील सर्वात कमी उंचीची म्हैस म्हणून तिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. तिचा छोटासा बांधा आणि गोंडस रूप पाहून लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक जण आश्चर्य व्यक्त करीत आहे. बोराटे म्हणाले, “या म्हशीचा आम्हाला खूप अभिमान आहे. घरातील लहान मुलाप्रमाणे तिची काळजी घेतो. गिनीज बुकमध्ये नोंद झाल्यापासून तिला पाहण्यासाठी राज्यभरातून लोक येतात. महोत्सवात या म्हशीला पाहण्यासाठी सकाळपासूनच गर्दी होत आहे.