Headlines

केअर टेकरने वृद्धेचा केला गळा आवळून खून:पानमंगरूळ येथील घटना, दोन दिवसांनंतर‎उघडकीस आला प्रकार, 2 तोळे सोने केले लंपास‎




आई-वडिलांच्या देखभालीसाठी ठेवलेल्या तरुणानेच वयोवृद्ध आजीची तिच्या साडीच्या पदराने गळा आवळून हत्या केली. ही घटना पानमंगरूळ येथे घडली. याबाबतची हकीकत अशी, जमिनीत शांताबाई तद्देवाडी (वय ८१) आणि तिचे पती भीमशा (वय ९३)हे दोघे पती-पत्नी शेतात वस्तीवर राहत होते. त्यांचा मुलगा संगप्पा हा पुणे येथे माळी काम करतो. वडिलांचा पाय मोडल्यामुळे आणि वयामुळे त्यांना पुणे येथे राहणे जमत नव्हते म्हणून त्यांना शेतात आणून ठेवले होते. त्यांच्या देखभालीसाठी रोहित या तरुणाला ठेवले होते. रविवारी दुपारी दीड दोन वाजेपर्यंत संगप्पा तड्डेवाडी हा आपल्या आईच्या संपर्कात होता. पुढे दुपारनंतर मात्र संपर्क होण्यास तयार नव्हता. रोहितचाही मोबाईल लागत नव्हता. रविवारनंतर सोमवारी सकाळपर्यंत नंबर लागत नसल्याने संगप्पा याने शेतातील माणसाला फोन करून घरी जाऊन पाहण्यास सांगितले ते पाहिले असता संगप्पाची वयोवृद्ध आई ही मरण पावलेल्या स्थितीत आढळली. तातडीने पोलिसांना ही माहिती कळवण्यात आली. शांताबाई तब्येवाडी तिचा कोणीतरी अज्ञात कारणावरून साडीच्या पदराने गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भात गुरण्णा मुडगी यांनी दक्षिण पोलिसात सोमवारी फिर्याद दाखल केली. केअर टेकर रोहित माने (रा. वाठार, ता. कराड, जि. सातारा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. दहा दिवसांपूर्वी एका मध्यस्तामार्फत केअर टेकर म्हणून ठेवले होते. तो न सांगता निघून गेला. दुसऱ्या दिवशी फोन न लागल्याने मुलाने मित्राला संपर्क करून घरी गेल्याने ही घटना उघडकीस आली. मयत आईचे सह दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र घेऊन गेला आहे. साडीने गळा आवळून खून केला. दुपारी एक वाजता उघडकीस आली. २५ तारखेच्या दुपारपासून ते २६ तारखेच्या दुपारपर्यंत ही घटना घडली असावी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *