Headlines

कॉर्पोरेट जिहाद, निदाचा पीडितेला मलेशियात पाठवण्याचा डाव हाेता:निदाला आश्रय देणारा एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल सहआराेपी




कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात छत्रपती संभाजीनगरातून अटक केलेल्या निदा खानला न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी सांगितले की, अनुसूचित जातीच्या पिडितेला मलेशियात इम्रान नावाच्या व्यक्तीकडे पाठवण्याचा डाव निदा खानने रचला होता. मानवी तस्करीचा हा प्रकार ग्राह्य मानून न्यायालयाने निदाला ११ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, नाशिकचे पोलिस आयुक्त, संदीप कर्णिक म्हणाले, निदाला आश्रय देणारा नारेगावचा नगरसेवक मतीन पटेलला सहआरोपी केले आहे. दुसरीकडे धर्मांतर प्रकरणावरून मंत्री शिरसाट आणि इम्तियाज जलील यांच्यात वाद पेटला. कुरेशी, मेमनला कोठडी; निदाच्या अडचणीत वाढ मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात (१७१/२०२६) शाहरुख हुसेन कुरेशी आणि रझा रफिक मेमन या दोघांना नाशिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोघांना मंगळवार दि. १२ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. निदाच्या कोठडीची मुदत सोमवार दि. ११ रोजी संपत आहे. मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल धर्मांतराच्या गुन्ह्यात निदाचा सहभाग निष्पन्न झाला असून तिचा ताबा घेण्यात येणार असल्याने निदाच्या अडचणी वाढल्या आहेत. निदा खान गुगलवर ‘ब्रेकआऊट’ ट्रेंडिंग ‘कॉर्पोरेट जिहाद’, लैंगिक छळ आणि सक्तीचे धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला अखेर अटक करण्यात झाली. या बहुचर्चित कारवाईनंतर संपूर्ण देशभरातून इंटरनेटवर “nida khan arrested or still absconding” (निदा खानला अटक झाली की ती अद्याप फरार आहे?) या प्रश्नाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, गुगल सर्चमध्ये या कीवर्डने १००% सर्च इंटरेस्टसह थेट ‘ब्रेकआऊट’ नोंदवला आहे.
विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी मांडलेले मुद्दे… कोर्टरुम लाईव्ह ॲड. अजय मिसर (सरकारी वकील) : पीडितेवर लैंगिक अत्याचाराच्या कटात निदाचा सहभाग आहे. पीडित अनुसूचित जातीची असून तिच्यावर दबाव टाकत धर्मांतर केले गेले. ती कोठे राहत होती? तिला कोणी मदत केली? फरार काळात तिला कोणी आर्थिक मदत केली? पीडितेला कशा प्रकारे प्रवृत्त केले? तिचे नाव बदलले होते का? तिला मलेशिया येथे इम्रानकडे पाठवले जाणार होते. हा इम्रान कोण? याच्या तपासासाठी कोठडी मिळावी. ॲड. राहुल कासलीवाल (निदाचे वकील): निदा फरार नव्हती, ती गरोदर असल्याने नातेवाईकांकडे होती. ॲड. मिलिंद कुरकुटे (पीडितेचे वकील): पीडितेच्या वतीने न्यायालयात पत्र देण्यात आले आहे. त्यात सरकारी वकिलांना साह्य करण्यासाठी अर्ज दिला असून खासगी वकील म्हणून आम्हाला बाजू मांडण्याची परवानगी मिळावी (कोर्टाने पिडितेच्या वकिलांची ही विनंती मान्य केली.) निदाला घेऊन पोलिस खासगी वाहनातून नाशिककडे जात होते. मात्र, गर्भवती असल्याचे कारण देत तिने जामीनासाठी अर्ज केला होता. त्यातून कायदेशीर गुंता निर्माण होवू नये अशी पावले उचलण्याची सूचना पोलिसांना नाशिक येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली. म्हणून पावणे दहाच्या सुमारास नाशिकचे पथक समृद्धी महामार्गाच्या अलिकडून पुन्हा छत्रपती संभाजीनगरात परतले. तिला गारखेडा परिसरातील एका न्यायाधिशांच्या निवासस्थानी नेऊन तिचा ट्रान्झिट रिमांड मिळवण्यात आला. त्यानंतरच पुढील कारवाईसाठी नाशिककडे रवाना करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *