![]()
सोलापूर कोंडी हॉटेल सुनील जवळ दुचाकीवरील चंद्रकांत जाधव, महेंद्र बिराजदार (एचपी पेट्रोल कर्मचारी) या दोघांचा बुधवार दि. २७ मे रोजी अपघात होऊन गंभीर जखमी झाले होते. सदर अपघातामधील रक्तबंबाळ जखमींची चिंताजनक अवस्था पाहून वायूवेग पथक क्र. ६ मधील कार्यरत
.
सदर अपघातामधील दोघांच्या डोक्याला मार लागला होता व ते रक्तबंबाळ झाले होते. मात्र, पाहणाऱ्यांची गर्दी खूप मोठी होती. उपचारासाठी त्यांना पाठवण्यासाठी कोणी मदत करण्यास तयार नव्हते. सदर रस्त्याच्या सर्विस रोड वरून वायूवेग पथक क्र. ६ मधील कार्यरत अधिकारी मोवानि राहुल खंदारे, समोवनि राजकुमार देशमुखसह चालक अमोल माने हे निघाले होते.
अपघात पाहून स्वतः उतरून राजकुमार देशमुख यांनी उचलून एका अपघातग्रस्ताला ऑटोरिक्षामध्ये तर दुसऱ्या अपघातग्रस्ताला ओम्नी मध्ये टाकून अगदी कुटुंबातल्या व्यक्तीप्रमाणे टाकलेल्या वाहनांमध्ये बसून धीर देत सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट केले. वेळेत उपचारासाठी दाखल केल्याने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. मात्र, डोक्याला जबरदस्त मार लागला आहे, फक्त हात पायाची हालचाल होत आहे. सदर ठिकाणी दीड दोनशे लोकांपैकी कोणाचेही त्यांना हात लावायचे धाडस झाले नाही. मात्र, वर्दीतल्या माणुसकीने एका रिक्षावाल्याला थांबवले. ^अपघातावेळी ‘गोल्डन अवर’मध्ये अपघातानंतरचा पहिला ६० मिनिटांचा कालावधी या वेळेत जखमी व्यक्तीला तातडीची वैद्यकीय मदत व उपचार मिळाल्यास त्याचे प्राण वाचण्याची शक्यता सर्वाधिक असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, पहिल्या एका तासात उपचार मिळाल्यास रस्ते अपघातातील सुमारे ५०% मृत्यू टाळता येऊ शकतात. त्यानुसार मी व माझ्या कर्मचाऱ्यांनी कुठलाही विलंब न करता सदर अपघातामधील जखमींना वेळेत उपचारासाठी पाठवण्याचा प्रयत्न केला आहे. माणूस म्हणून ते माझे कर्तव्य आहे. राहुल खंदारे, मोटार वाहन निरीक्षक, सोलापूर.
पहिल्या तासात उपचार मिळाल्यास अपघातातील ५०% मृत्यू टाळता येतात