Headlines

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनाचा भीषण अपघात:वाहनाचा चक्काचूर, 8 ते 10 जण गंभीर जखमी; सुदैवाने जीवितहानी टळली




गणपती बाप्पाच्या उत्सवासाठी मुंबईहून कोकणात आपल्या गावी निघालेल्या गणेशभक्तांच्या वाहनाचा राजापूर येथील हातिवले जवळ भीषण अपघात झाला आहे. वाहनाच्या उडालेल्या चक्काचुरावरून या अपघाताची भीषणता लक्षात येत असून, सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. मात्र, या भयानक दुर्घटनेत आठ ते दहा प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथून गणपती उत्सवासाठी गावी निघालेल्या प्रवाशांच्या फोर्स अर्बेनिया वाहनाचा अपघात झाला. राजापूर तालुक्यातील हातिवाले येथील अंकिता पॅलेससमोर हा भीषण अपघात झाला. रविवारी सकाळी हा अपघात झाला आहे. या वाहनात अंदाजे 15 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी आठ ते दहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व प्रवासी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कुणकावळे येथील असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. तसेच जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य तसेच अपघाताचा पंचनामा सुरू केला आहे. गणपती बाप्पाच्या उत्सवासाठी मुंबईहून कोकणात आपल्या गावी निघालेल्या गणेशभक्तांच्या वाहनाचा राजापूर तालुक्यातील हातिवले गावाजवळ अत्यंत भीषण अपघात झाला आहे. सणासुदीच्या आनंदात गावी जाणाऱ्या या प्रवाशांवर या अनपेक्षित अपघातामुळे मोठे संकट ओढवले आहे. या अपघाताची तीव्रता वाहनाच्या उडालेल्या चक्काचुरावरून स्पष्टपणे लक्षात येते. सुदैवाने या भयानक दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही, ही एकमेव दिलासादायक बाब आहे. मात्र, या अपघातात आठ ते दहा प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना वैद्यकीय मदतीसाठी हलवण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *