Headlines

खाटूश्यामजींचे दर्शन घेऊन परतणाऱ्या ट्रॅव्हलरची कंटनेरला धडक, 3 जण ठार:जयपूरजवळ अपघात, अजमेर सौंदाणेचे चुलत भाऊ गतप्राण




खाटूश्यामजींचे दर्शन घेऊन मुलांच्या शाळेच्या परीक्षेसाठी मध्यरात्री परतीची वाट धरणाऱ्या बागलाण तालुक्यातील अजमेर सौंदाणे येथील मगर कुटुंबावर काळाने भीषण घाला घातला. राजस्थानमधील जयपूर-अजमेर महामार्ग क्र. ५० वरील बगरू उड्डाणपुलाजवळ रात्री २ च्या सुमारास १०० ते १२० च्या वेगाने मिनी ट्रॅव्हलरने पुढे जाणाऱ्या ट्रेलरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात पाठीमागून जोरदार धडक दिली. यात दीपक त्र्यंबकसिंग मगर (६७), संदीप रामसिंग मगर (५६) व महेश विजयसिंह मगर (४८) या तीन चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅव्हल्समधील २५ हून अधिक भाविक जखमी झाले असून त्यातील सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जयपूरहून निघालेल्या या वाहनाला अवघ्या ३० किमी अंतरावर हा अपघात नडला. अजमेर सौंदाणे येथून मगर परिवारातील लहान मुले, महिला व पुरुषांसह २८ जण जायखेडा नजीकच्या मेंढीपाडे येथील मिनी ट्रॅव्हल्सने राजस्थानातील प्रसिद्ध खाटूश्यामजींच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपल्यानंतर दुपारी ते जयपूरला पोहोचले. तेथे नातेवाइकांकडे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी मुलांची शाळेची परीक्षा असल्याने रात्री १ वाजताच जयपूरहून परतीचा प्रवास सुरू केला. मात्र, जयपूर सोडल्यानंतर अवघ्या तासाभरात बगरू उड्डाणपुलाजवळ ट्रॅव्हल्स ट्रेलरवर मागून धडकली. गाडी हळू चालवा सांगितले, चालक ऐकेना “मुलांच्या परीक्षेमुळे आम्ही रात्री १ वाजता जयपूरहून प्रवासाला निघालो. ड्रायव्हरला वारंवार हळू चालवण्यास सांगूनही त्याने ऐकले नाही. बगरू पुलाजवळ भरधाव गाडीने थेट कंटेनरला जोराची धडक दिली. अपघातानंतर चालक पसार झाला. स्थानिक लोकांनी गाडीचे पत्रे कापून आम्हाला सुखरूप बाहेर काढले,” असे जखमी प्रवासी राहुल मगर म्हणाले. मुलांची परीक्षा असल्याने रात्री १ वाजताच परतीचा प्रवास सुरू अजमेर सौंदाणेहून सोमवारी निघालेल्या भाविकांची मिनी ट्रॅव्हल्स मंगळवारी पहाटे गुजरात सीमेवरील कुबेर येथे बंद पडली. गाडी दुरुस्त न झाल्याने दिवसभर खोळंबलेल्या भाविकांसाठी जायखेड्यावरून तातडीने दुसरी २६ सीटर गाडी पाठवण्यात आली होती. सुरुवातीलाच विघ्न येऊनही भाविक पुढे निघाले, मात्र अखेर परतीच्या वाटेवर काळाने घाला घातला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *