![]()
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे वाऱ्यांची दिशा बदलली आहे. त्याचा थेट परिणाम विदर्भातील वातावरणावर जाणवू लागला आहे. दक्षिण भारतातून पुढे सरकणारे ढग मालेगाव, छत्रपती संभाजीनगरमार्गे अकोला, यवतमाळ व चंद्रपूरच्या दिशेने येत आहेत. हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशातून पूर्व विदर्भाजवळून मध्य प्रदेशाच्या दिशेने सरकणार आहे. त्यामुळे अकोल्यात आकाश ढगाळ राहील. २८, तसेच प्रामुख्याने २९ ऑक्टोबर रोजी अकोला शहर व लगतच्या भागात तुरळक पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या पावसाळा संपून हिवाळा सुरू होण्याचा संक्रमण काळ आहे. सूर्याचे दक्षिणायन पूर्ण होईपर्यंत तापमानात मोठी घट होणार नाही. प्रत्यक्ष थंडीची चाहूल नोव्हेंबर महिन्यापासून लागण्याचा अंदाज आहे. उत्तर भारतातून थंड, कोरडे वारे हळूहळू दक्षिणेकडे सरकत आहेत. त्यामुळे रात्रीचे तापमान कमी होत आहे. दिवसाची उष्णता, बाष्पीभवन, वाऱ्यांचा मंद वेग, रात्रीच्या थंडीमुळे हवेतील धूलिकण व आर्द्रता एकत्र येत आहेत. त्यामुळे आकाश अंशतः ढगाळ दिसत आहे. . प्रा. डॉ. सुरेश चोपने, हवामानतज्ञ चक्रीवादळाचा प्रभाव बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आणि वाऱ्यांची दिशा बदलल्याने अकोल्यासह विदर्भातील हवामानात बदल झाला आहे. ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव आंध्र प्रदेशातून पूर्व विदर्भाकडे जाणवणार असून, २८, २९ ऑक्टोबर रोजी तुरळक पावसाची शक्यता आहे.
Source link
चक्रीवादळाने ढगाळ हवामान; 29 ला पाऊस:सूर्याचे दक्षिणायन पूर्ण होईपर्यंत थंडी नाही; नोव्हेंबरपासून थंडी