![]()
शहरातील संकटमोचन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृहाजवळ जुन्या वैमनस्यातून शनिवारी रात्री दोन गटांत रक्तरंजित गँगवार झाला. यात अभय उर्फ बित्तम पाथोडे (25, रा. भोसा) आणि जाधव (21, रा. मालानी नगर) यादोन्ही गटांतील एका-एका तरुणाची हत्या करण्यात आली. अभय पाथोडे आणि कृष्णा सिडाम यांच्या गटांत गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होता. शनिवारी रात्री अभय पाथोडे वसतिगृहाजवळ बसला असल्याची पक्की माहिती विरोधी गटाला मिळाली होती. तोंडाला कापड बांधलेल्या 10 ते 12 हल्लेखोरांनी अचानक धाव घेत अभयवर धारदार शस्त्रांनी जोरदार हल्ला चढवला. या प्राणघातक हल्ल्यात अभयचा जागीच मृत्यू झाला. तर श्री जाधव यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात दिलीप पाथोडे यांच्या तक्रारीवरून प्रणय शिंदे, श्री जाधव, ओम सलाम, क्रिष्णा सिडाम, सौरव काळे व इतरांवर, तर हत्या झालेल्या श्री जाधव याचा भाऊ भूषण जाधव याच्या तक्रारीवरून अभय पाथोडे, दर्शन ढोरे, गौरव भेंडारकर व इतरांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल केले. रक्ताचे थारोळे अन् संशयास्पद बाटल्या घटनास्थळाची पाहणी केली असता, वसतिगृहाच्या बाजूला रक्ताचे थारोळे साचलेले आढळले. जमिनीवर विखुरलेल्या दारूच्या आणि पाण्याच्या बाटल्यांमुळे हल्ल्यापूर्वी तेथे मद्यप्राशन सुरू होते की, हल्लेखोरांनी आधीच रेकी केली होती, असा संशय बळावला आहे. तोंडाला कापड बांधून आलेल्या 10 ते 12 सराईत गुंडांनी अत्यंत नियोजनबद्ध रीतीने हा हल्ला केला. हे स्पष्ट झाले आहे. पोलिस अधीक्षकांची प्रत्यक्ष पाहणी रविवारी जिल्हा पोलिस अधीक्षककुमार चिंता यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी ठाणेदार अजित कदम यांच्याकडून तपासाचा आढावा घेतला.घटनेतील पसार आरोपींना तातडीने अटक करण्यासाठी विशेष पथके गठित करून या प्रकरणाचा मुळापासून तपास करण्याचे स्पष्ट निर्देश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत.
Source link
यवतमाळमध्ये दोन गटांतील जुना वाद विकोपाला:वसतिगृहाजवळ अभय पाथोडेची जागीच हत्या, तर उपचारादरम्यान जाधवांचा मृत्यू