Headlines

खुनाचा प्रयत्न प्रकरणी दोन रिलस्टार महिलांना अटक:पुणे गुन्हे शाखेने केली कारवाई, डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल




खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी फरार असलेल्या दोन ‘रिलस्टार’ महिला आरोपींना पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-७ ने अटक केली आहे. माधवी राजेश कुंभार (वय २२, रा. काळेपडळ, हडपसर) आणि स्नेहल संजय सोनकें (वय २०, रा. तुळजाभवानीनगर, पिंपळे गुरव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रील स्टार म्हणून माधवी कुंभार सोशल मीडियावर प्रसिद्ध असून तिने किरकोळ वादातून वरील स्टार तरुणावर जीव घेणा हल्ला केल्याचा प्रकार पोलिसांच्या तपासात उघडकीस आला आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारतीय न्याय संहितेतील कलम १०९(१), १८९, १९० आणि अन्य संबंधित कलमांनुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. गुन्हे शाखा युनिट-७ चे पथक आरोपींचा शोध घेत असताना, त्यांना मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही महिला आरोपी पुणे शहरातील मगरपट्टा-लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्थानिक बातमीदाराच्या मदतीने सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस उपायुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलिस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. युनिट-७ चे पोलिस उपनिरीक्षक राहुल कोळपे, विनायक साळवे, अमोल ढोणे, सुहास तांबेकर, गिरीश नाणेकर, सारंग दळे, प्रशांत कापूरे, निलेश साळवे, निर्णय लांडे, विकास कदम यांच्यासह महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील कायदेशीर कारवाईसाठी दोन्ही आरोपींना डेक्कन पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *