Headlines

खुन्याला पकडण्यासाठी संभाजीनगरचे पाेलिस कंत्राटी कर्मचारी बनले:नालेसफाईही केली, 9 महिन्यांपूर्वी फळविक्रेत्याला भाेसकून मुंबईत लपला हाेता



जुन्या वादातून पाच जणांनी तलवारीने गळा चिरून आणि पाय तोडून एका तरुणाची निर्घृण हत्या केली होती. ही घटना ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास शहाबाजार येथील चंपा चौक परिसरातील निशान दर्ग्याजवळ घडली होती. समीर इनायत खान (३०, रा. काचीवाडा

.

या गुन्ह्यात यापूर्वीच चार आरोपींना अटक करण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने फरार आरोपी आसिफ ऊर्फ रायडर हनीब सय्यद (३३, रा. चेलीपुरा, काचीवाडा, ह.मु. छोटा सोनापूर, नागपाडा, मुंबई) याला मुंबईतून अटक केली अशी माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.

आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी मुंबई महानगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी असल्याचा बनाव रचला होता. सध्या मुंबईत मॅनहोलची समस्या गंभीर आहे. ते साफ करण्याच्या बहाण्याने पोलिसांनी परिसरात चौकशी सुरू केली.

मॅनहोल सफाईनिमित्त घरात डोकावता आले

मॅनहोल सफाईच्या बहाण्याने पोलिसांना अनेक घरांत डोकावण्याची संधी मिळाली. या माध्यमातून सलग दोन ते तीन दिवस संबंधित भागात रेकी करण्यात आली. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी एका टपरीवर चहा पिण्यासाठी आला. पोलिसांचा संशय आल्याने तो पळू लागला. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला पकडले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *