Headlines

गर्भपात प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शिर्डीतून जेरबंद:15 हजारांच्या कमिशनसाठी साखळी सक्रिय




शहरातील रशीदपुरा भागात उघडकीस आलेल्या अवैध गर्भपात रॅकेटमधील मुख्य एजंट मंगेश सुखदेव थोरात (वय ४०, रा. जटवाडा रोड) याला गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (३० मे) बेड्या ठोकल्या. पोलिसांची कारवाई सुरू झाल्याचे समजताच तो शिर्डी येथे जाऊन लपला होता. महिलांना गर्भपातासाठी पोहोचवण्यासाठी तो तब्बल १५ हजार रुपये कमिशन घेत असल्याचे तपासात पुढे आले आहे. पैसे संपले अन् जाळ्यात अडकला रशीदपुरा प्रकरणात २८ एप्रिल रोजी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांची धरपकड सुरू झाली होती. कारवाईची धास्ती घेऊन थोरातने थेट शिर्डी गाठली होती आणि तेथील देवस्थानच्या एका खोलीत तो लपून बसला होता. मात्र, जवळचे पैसे संपल्याने घरून पैसे घेण्यासाठी तो शहरात परतणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे गुरुवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानक (सेंट्रल बसस्टँड) परिसरात सापळा रचून प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून त्याला ताब्यात घेण्यात आले. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सहायक पोलिस निरीक्षक रविकांत गच्चे आणि सहायक फौजदार दिलीप मोदी यांच्या पथकाने ही कामगिरी केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, ५ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मंगेश निघाला समन्वयक या रॅकेटमध्ये मंगेशची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. ग्रामीण भागातील डॉक्टर आणि प्रत्यक्ष गर्भपात करणारी शाहेदा परवीन यांच्यात तो एजंट म्हणून काम करत होता. रुग्णांना शोधून त्यांना सुरक्षितपणे शाहेदाकडे पोहोचवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. या कामाच्या मोबदल्यात मिळणाऱ्या कमिशनमधून त्याने मोठी माया जमवल्याचा संशय आहे. त्याच्या अटकेमुळे आता या साखळीत सहभागी असलेले अनेक पांढरपेशे डॉक्टर पोलिसांच्या रडारवर आले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *