Headlines

गुरुपौर्णिमेनिमित्त यात्रीनिवासचे बुकिंग फुल्ल:अन्नछत्र 12 तास सेवेत, श्री स्वामी समर्थ मंदिर, अन्नछत्र मंडळासह समाधी मठाची गुरुपौर्णिमा उत्सवाची तयारी उत्साहात



श्री गुरुपौर्णिमा निमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरासह समाधी मठ व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने जय्यत तयारी केली आहे. भक्तनिवास, यात्री निवासाचे बुकिंग फुल्ल झाले असल्याचे व्यवस्थापनाने कळवले आहे. स्वामी समर्थांचे मंदिरात होणारी भाव

.

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे बुधवारी मंदिरात नित्य नियमाने होणारी काकड आरती पहाटे ४ वाजता होईल. गर्दी लक्षात घेऊन मंदिर बुधवारी पहाटे २ वाजता उघडण्यात येईल. या दिवशी स्वामी भक्तांचे नित्यनियमाने होणारे अभिषेक होणार नाहीत. सकाळी ११ वाजता नैवेद्य आरती होईल. रात्री ७:५० ते रात्री ८:३० या वेळेत श्रींची शेजारती संपन्न होईल. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता महिला व पुरुष भक्तांची स्वतंत्र दर्शन रांग, पोलिस बंदोबस्त, बॅरेकेटींग दर्शन रांग, दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याची सोय, प्रथमोपचार केंद्र, वैद्यकीय सेवा, व्हीलचेअर इत्यादी सुविधांची तयारी केल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या कुशल नेतृत्वामुळे राज्यासह भारत देशातच नव्हे तर परदेशात श्रीक्षेत्र अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचा महाप्रसाद म्हणून श्री भक्तांतून ओळख असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३९ वा. वर्धापन दिन आणि श्री गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या निमित्ताने महाप्रसादालय, परिसरातील विविध मंदिर, शिवस्मारक, यात्री निवास, यात्री भुवन आदी ठिकाणी नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमा निमित्त बुधवारी सकाळी ११.३० ते रात्री ११.३० वाजेपर्यंत प्रसाद सेवा चालू राहील. सकाळी ७ ते ९ पर्यंत महाप्रसाद गृह येथे सारामृत ग्रंथाचे पारायण होईल. सकाळी ९ ते १० पर्यंत नामस्मरण, जप. मान्यवरांच्या हस्ते श्रींची महाआरती व महानैवेद्य दाखविण्यात येणार आहे. केंद्रीय नागरी उड्डाण राज्य मंत्री मुरलीधर मोहळ, पालकमंत्री जयकुमार गोरे, मंत्री भरत गोगावले, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे आदी उपस्थित राहणार. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ पार्किंग, श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल, ख्वाजा नुरद्दीन बाबा दर्गा मैदान, थडगे मळा परिसर, श्री मालोजीराजे भोसले यांचे मालकी जागेवर, मंगरूळ चौक ते स्वामी समर्थ मंदिर जाणाऱ्या नव्याने बांधण्यात येत असणाऱ्या रोडवर, श्री मल्लिकार्जुन मंदिर परिसर या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांचे पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे. अन्नछत्र मंडळाच्या यात्री निवासात मिनी हॉलसह कॉमन ६६ खोल्या असून १४ मोठे हॉल आहेत. पैकी दहा हॉलमध्ये बेडची व्यवस्था केली आहे. या इमारतीमध्ये सुमारे २००० भक्त निवासाला थांबू शकतील इतकी क्षमता आहे. यात्री भुवन या इमारतीत नॉन एसी सुट आणि एसी सुट तसेच डिलक्स एसी सुट आहेत. येथे सुमारे ५०० भक्त निवास करू शकतील इतकी क्षमता आहे. .

अन्नछत्र मंडळाकडून सकाळी ११:३० पासून प्रसाद

अन्नछत्र येथे नयनरम्य विद्युत रोषणाई

अन्नछत्र मंडळाचे यात्री निवास भाविकांनी फुल्ल



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *