Headlines

गोलटगाव येथील कंत्राटदार बेपत्ता; करमाड पोलिसांत अपहरणाचा गुन्हा:23 ऑक्टोबरपासून कुटुंबासोबत संपर्क नाही, मोबाइलही बंद



छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गोलटगाव येथील ५१ वर्षीय कंत्राटदार इंद्रजीत खुळे हे अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. ते गेल्या २३ ऑक्टोबरपासून घरी परतलेले नसून त्यांचा मोबाईल क्रमांकही सतत बंद येत आहे. नातेवाईकांनी विविध ठिकाणी शोध घेऊनही त्या

.

मिळालेल्या माहितीनुसार, गोलटगावचे रहिवासी असलेले इंद्रजीत खुळे हे शेंद्रा एमआयडीसी परिसरात लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले होते. मात्र, सायंकाळ झाली तरी ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांची चिंता व्यक्त करत शोध घेण्यास सुरुवात केली. नातेवाईकांकडे तसेच इतर संभाव्य ठिकाणी चौकशी करण्यात आली, परंतु त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. त्यांचा फोन बंद येत असल्याने संशय अधिक बळावला. अखेर कोणताही सुगावा न लागल्याने त्यांचे पुतणे विशाल भास्कर खुळे यांनी करमाड ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार सुभाष भाकरे करत आहेत. कंत्राटदार खुळे हे नेमके कुठे गेले आहेत आणि त्यांच्या अचानक गायब होण्यामागे काय कारण आहे, याचा शोध पोलिस यंत्रणा घेत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *