![]()
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून ऑटोरिक्षात बेकायदेशीरपणे गॅस भरण्याचा प्रकार वैजापूर शहरातील शंकरनगर भागात उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री छापा टाकून दोघांवर कारवाई केली. घटनास्थळावरून ११ गॅस सिलिंडर, गॅस भरण्याची मोटार
.
विद्युत मोटार, नळीच्या साहाय्याने गॅस भरला : विद्युत मोटार आणि विशिष्ट नळीच्या साहाय्याने सिलिंडरमधून ऑटोमध्ये धोकादायक पद्धतीने गॅस भरत असल्याचे समोर आले. अनधिकृत गॅस रिफिलिंग करताना स्फोट होऊन मोठा अपघात घडण्याची शक्यता असते. पोलिसांनी घटनास्थळावरून विद्युत मोटार, रिफिलिंगसाठी वापरण्यात येणारी नळी जप्त केली. या प्रकरणी वैजापूर ठाण्यात गुन्हा दाखल आहे.