![]()
तू काकाला का बोलली म्हणून पत्नीला जाब विचारत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने गावठी कठ्यातून गोळ्या झाडल्या. यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. लोहा शहरातील शिक्षक कॉलनी येथे सोमवारी मध्यरात्री हा गोळीबाराचा थरार घडला. पत्नीला गोळ्या घातल्यानंतर आरोपीने सासर्याला फोन करून ‘ तुझ्या पोरीला गोळ्या घातल्यात आता तुझ्याकडे येतो.’ अशी धमकी देऊन तो फरार झाला. लोहा शहरातील शिक्षक कॉलनी परिसरातील रहिवाशी विशाल जाधव आणि त्याची पत्नी अर्चना जाधव यांच्यात सोमवारी मध्यरात्री वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर विशालने पत्नीला आधीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. संतापाच्या भरात त्याने आपल्या कमरेला ठेवलेले गावठी कट्टा काढून तिच्यावर गोळीबार केला. यावेळी त्याने पत्नीवर सलग तीन गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी कानाला चाटून गेली, तर दुसरी गोळी पाठीत लागल्याने अर्चना गंभीर जखमी झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अर्चनाला तिच्या सासऱ्याने आणि तेथे जमलेल्या नागरिकांनी तातडीने उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. नीलम रोहन यांच्यासह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. फॉरेन्सिक व फिंगरप्रिंट पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे संकलित केले आहेत. आरोपीच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी विशाल जाधव याच्याविरुद्ध मे 2023 मध्ये पेट्रोल पंप लुटीचा गुन्हा दाखल दाखल असून तो नुकताच जामीनावर सुटला होता. दरम्यान आरोपी विशाल जाधव व नांदेड येथे खाजगी वाहन चालवतो यादरम्यान तो अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी झाला होता, अशी माहिती पोलिसांनी सांगितली आहे. आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकासह लोहा पोलिसांनी अनेक टीम वेगवेगळ्या दिशेने रवाना केले आहेत. स्वाराती विद्यापीठातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्याची आत्महत्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरात मंगळवारी सकाळी एक दुर्दैवी घटना उघडकीस आली. सोशल वर्क विषयात पीएचडीचे संशोधन करणारे विद्यार्थी राहुल सोनाळे यांनी विद्यापीठाच्या भाषा संकुल परिसरातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ५ वाजण्याच्या दरम्यान गस्तीवर असलेल्या सुरक्षा रक्षकाला ही घटना निदर्शनास आली. त्यानंतर तातडीने विद्यापीठ प्रशासन आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. राहुल सोनाळे हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सोशल वर्क विषयात पीएचडीचे संशोधक विद्यार्थी होते. त्यांच्या निधनामुळे विद्यापीठ परिसरात शोककळा पसरली असून विद्यार्थी, प्राध्यापक आणि सहकाऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेमागील कारण स्पष्ट होणार आहे. हे ही वाचा… शिंदेंच्या माजी नगरसेवकाची महिला डॉक्टर अन् नर्सला मारहाण:कल्याणमधील संतापजनक प्रकार, घटनेचे CCTV फुटेज व्हायरल कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातील एका महिला डॉक्टर, नर्स आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना थेट मारहाण आणि धक्काबुक्की करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांवर या मारहाणीचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या घटनेचे खळबळजनक सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सविस्तर वाचा… कबुतरांमुळे माझ्या आईचा मृत्यू झाला:विधानसभेत भावुक झाले राम कदम, कबुतरखाने नॅशनल पार्कमध्ये स्थलांतरित करण्याची मागणी मुंबईतील कबुतरांमुळे वाढणाऱ्या आरोग्याच्या धोक्याचा मुद्दा भाजप आमदार राम कदम यांनी विधानसभेत अत्यंत भावनिक पद्धतीने उपस्थित केला. आपल्या आईचे निधन फुफ्फुसांच्या इंटरस्टिशियल लंग डिसीज (ILD) या गंभीर आजारामुळे झाल्याचे सांगताना ते भावुक झाले. कबुतरांच्या विष्ठेमुळे (ड्रॉपिंग्ज) हवेत पसरणाऱ्या घटकांमुळे हा आजार बळावतो, असा दावा करत त्यांनी सरकारने तज्ज्ञ समिती नेमून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. सविस्तर वाचा…
Source link
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर झाडल्या गोळ्या:सासर्यालाही फोनवरून दिली धमकी, नांदेडमधील धक्कादायक घटना; आरोपी पती फरार