Headlines

पुण्यात पाण्यात अडकलेल्या बसमधून सहा कर्मचाऱ्यांची सुटका:वाघोली-लोहगाव रस्त्यावर खासगी कंपनीच्या बसला अग्निशमन दलाने वाचवले




वाघोली-लोहगाव रस्त्यावर मंगळवारी सकाळी एका खासगी कंपनीची बस साचलेल्या पाण्यात अडकली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत बसमधील सहा कर्मचाऱ्यांची सुटका केली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. शहर परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मंगळवारी सकाळी लोहगाव-वाघोली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने, या रस्त्यावरून निघालेल्या बस चालकाने पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बस पाण्यात अडकली आणि चालकाला पुढे जाणे शक्य झाले नाही. रस्त्यावर साधारणपणे चार ते पाच फूट पाणी साचल्याने बस चालक आणि कर्मचाऱ्यांना बसमधून बाहेर पडणे शक्य नव्हते. बस पाण्यात अडकल्याने आतील कर्मचारी अडकून पडले होते. या घटनेची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. पुणे महापालिका आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशमन दलातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी प्रसंगावधान राखून दोराचा वापर करत पाण्यात अडकलेल्या बस चालकासह सहा कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. यापूर्वी सोमवारी दुपारी जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील भुयारी मार्गात साचलेल्या पाण्यात एक टेम्पो अडकला होता. पाण्याच्या प्रवाहात टेम्पो वाहत असताना बंदोबस्तावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी तत्परता दाखवत टेम्पोचालकाचे प्राण वाचवले होते. दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू दुचाकीच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना टिळक रस्त्यावर घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला टिळक रस्त्यावरील विजय सेल्स समोरुन निघाली होती. रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीने महिलेला धडक दिली. अपघातात महिला गंभीर जखमी झाली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच ओळख पटलेली नाही. ती फिरस्ती असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. सहायक पोलीस निरीक्षक एस महाले तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *