Headlines

चिमेगावात पूर्णा नदीपात्रात वाळू तस्करांवर मोठी कारवाई:2 जेसीबी, 3 हायवा, 1 ट्रॅक्टरसह 1.25 कोटींचा मुद्देमाल जप्त




औंढा नागनाथ तालुक्यातील चिमेगाव शिवारातील पूर्णा नदीच्या पात्रातून वाळू उपसा करून वाहतूक करणारे २ जेसीबी, ३ हायवा, १ ट्रॅक्टरसह १.२५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक व हिंगोलीच्या महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. ४ गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील चिमेगाव शिवारात पूर्णा नदीच्या घाटावरून मागील काही दिवसांत बेसुमार वाळू उपसा सुरु होता. त्या ठिकाणी जेसीबी द्वारे वाळू उपसा करून हायवा व ट्रॅक्टरद्वारे त्याची वाहतूक केली जात होती. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी वाळू उपसा आणि वाहतूक केली जात होती. दरम्यान, पूर्णा नदीच्या पात्रातून रात्रीच्या वेळी वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने तसेच औंढा नागनाथचे तहसीलदार हरीष गाडे, मंडळ अधिकारी आशा गिते यांच्या पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास पूर्णा नदीपात्रात जाऊन तपासणी केली. यावेळी त्या ठिकाणावरून जेसीबी द्वारे वाळू उपास सुरू होता तर हायवा व ट्रॅक्टरमध्ये वाळू भरली जात होती. यावेळी पथकाने जेसीबी, हायवा व ट्रॅक्टरसह उपसा केलेली वाळू असा १.२५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी मंडळ अधिकारी आशा गिते यांच्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात वाहन चालक व मालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. उपनिरीक्षक अमोल इंगोले पुढील तपास करीत आहेत. विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *