Headlines

छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा काढला तेव्हा डीजे वाजला नव्हता:हिंदू सुरक्षित आहेत, कोणी स्वतःला 'हिंदूहृदयसम्राट' समजू नये- संजय राऊत




भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांनी गेल्या 10 वर्षांत देशातील सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम केले आहे. आज देशात हिंदू पूर्णपणे सुरक्षित आहेत, त्यांना कोणताही धोका नाही. तरीही सर्व विषय त्याच मुद्द्यावर नेऊन मूळ प्रश्नांना बगल दिली जाते. इतिहास साक्षी आहे की, हिंदू ज्या ज्या वेळी संकटात सापडला, त्या वेळी फक्त बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनाच मदतीला पुढे आली आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. हिंदू सुरक्षित आहेत, त्यामुळे कोणीही स्वतःला ‘हिंदूहृदयसम्राट’ समजण्याचा आव आणू नये, असा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. शिवसेना भवनावरील बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोच्या मुद्द्यावरून उपोषणाचा इशारा देणाऱ्यांवर टीका करताना राऊत म्हणाले, सशिवसेना भवनावरील बाळासाहेबांच्या फोटोवर आक्षेप घेऊन उपोषणाची धमकी देणाऱ्या वकिलाने उपोषण करून प्राणांत केला पाहिजे, असे लोक वकिली पेशाला कलंक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांबद्दल ज्यांच्या मनात घृणा आहे, अशा लोकांचा इच्छामरणाचा अर्ज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मान्य करावा, अशी खोचक टीका त्यांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचे नाव न घेता केली.

नाचगाण्यांवरून फडणवीसांवर निशाणा संजय राऊत म्हणाले की, ठाण्यात दहीहंडीच्या मंचावर महिलांना कोण नाचवत होते? ही आपली संस्कृती आहे का? गृहमंत्री फडणवीस यांनी या सर्व प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. राज्यात उघडपणे फिरणाऱ्या सुपारी किलर्स’ला फडणवीसांनी रोखले पाहिजे. गृहमंत्र्यांची भूमिका कुंपणावर संजय राऊत म्हणाले की, डीजेच्या भीषण आवाजामुळे होणारा मानसिक आणि शारीरिक त्रास आज नागरिक ओरडून सांगत आहेत. खुद्द मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या भावाचे निधन डीजेच्या आवाजामुळे झाल्याचे त्यांनी स्वतः सांगितले आहे. डीजेच्या गोंधळामुळे रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू न शकल्याने एका महिलेच्या वडिलांनी तिच्या हातावर प्राण सोडल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. अशा सामाजिक विषयावर लोक एकत्र येत असतील तर त्याला पाठिंबा दिला पाहिजे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही लोकांच्या भावनेला पाठिंबा दिला, मात्र गृहमंत्री फडणवीस नेहमीप्रमाणे कुंपणावर बसून आहेत. मग ते मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कशासाठी आहेत? असा सवाल त्यांनी केला. नागपूर आणि मुंबई पोलिस आयुक्तांनी डीजेबाबत कठोर भूमिका घेतली, मग पुण्यातच सवलत का? मुख्यमंत्र्यांवर कोणाचा दबाव आहे का, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे, असेही ते म्हणाले. बापटांना मोर्चात जाण्यापासून रोखणे म्हणजे गृहमंत्र्यांचे अपयश संजय राऊत म्हणाले की, बापट हे कालच्या डीजेविरोधातील मोर्चाला उपस्थित राहू शकले नाहीत, कारण त्यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगत पोलिसांनीच त्यांना मोर्चात न जाण्याचा सल्ला दिला. आंदोलकांना सुरक्षेचे कारण देऊन रोखणे हे गृहमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचे मोठे अपयश आहे. भाजपने राज्यात गुंडांच्या आणि खुन्यांच्या टोळ्या पाळल्या आहेत का? असा प्रश्न पडतो. सध्याचे गृहमंत्री पूर्णपणे अपयशी ठरले असून राज्याला आता पूर्णवेळ गृहमंत्री मिळणे गरजेचे आहे. शिवरायांनी अफझलखानाला मारले तेव्हा डीजे वाजला नव्हता! संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या गटातील राज्यमंत्री कदम यांनीही डीजेला पाठिंबा दिला आहे. त्यांनी स्वतःच्या सोसायटीच्या आवारात डीजे वाजवत बसावे, काही दिवसांनी त्यांना हेच काम करावे लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा अफझलखानाचा कोथळा काढला, तेव्हा कुठेही डीजे वाजला नव्हता. डीजे ही आपली संस्कृती नाही, हेच ठाकरे कुटुंबाचे स्पष्ट मत आहे. हे ही वृत्त वाचा मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 10 वा दिवस:पाणी अन् उपचार नाकारल्याने प्रकृती खालावली, वैद्यकीय तपासणीलाही दिला नकार
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा 10 वा दिवस आहे. गेली 2 दिवस त्यांनी उपचार आणि पाणी न घेण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची प्रकृती खराब झाली आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *