Headlines

छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेला गती:मुख्यमंत्र्यांकडून कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश




छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना शाश्वत आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील वर्षा निवासस्थानी एक संयुक्त आढावा बैठक पार पडली. महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत शहरासाठी सुरू असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रखडलेली कामे, प्रलंबित तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी तातडीने दूर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच, संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय राखत योजनेची वेळेत आणि गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी सुनिश्चित करण्यावर भर देण्यास सांगितले. छत्रपती संभाजीनगरकरांना पाण्यासाठी होणारा त्रास कायमस्वरूपी दूर करून प्रत्येक नागरिकापर्यंत शुद्ध व मुबलक पाणी पोहोचावे, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. पाणीपुरवठा योजनेची सर्व कामे अधिक वेगाने पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. या बैठकीस सामाजिक न्याय तथा पालकमंत्री संजय शिरसाठ आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. खासदार संदीपान भुमरे, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, आमदार सुहास सिरसाट, आमदार सतीश चव्हाण, महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्यासह महानगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हेही वाचा.. आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे पुनरागमन:छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसराला दिलासा छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरात बुधवारी सायंकाळी आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला. विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यांसह झालेल्या मुसळधार पावसाने शहराला झोडपून काढले. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने वाढलेल्या उष्णतेमुळे आणि दमट हवामानामुळे नागरिक त्रस्त झाले होते. सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *