Headlines

जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी खुल्या कारागृहातून पसार:भुईंज पोलिस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी होता




येरवडा येथील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा एक कैदी पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून कैद्याचा शोध सुरू आहे. संतोष लक्ष्मण भिंगारे (रा. पाचवड, ता. वाई, जि. सातारा) असे पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे. कारागृहातील अधिकारी नागनाथ भानवसे यांनी याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिंगारे याला सातारा जिल्ह्यातील भुईंज पोलिस ठाण्यात दाखल खुनाच्या गंभीर गुन्ह्यात न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्याला कोल्हापूर येथील खुल्या जिल्हा कारागृहातून येरवडा येथील खुल्या कारागृहात हलवण्यात आले होते. त्याची वर्तणूक चांगली असल्याने त्याला कारागृहात केशकर्तनाचे कामही देण्यात आले होते. ८ मे रोजी वरिष्ठ अधिकारी खुल्या कारागृहातील शेती विभागाची पाहणी करत असताना, तुती बागेत एक मोबाईल सापडला. त्यात सीमकार्ड नव्हते. या प्रकरणी भिंगारे याच्यासह आणखी एका कैद्याची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर भिंगारे बराकीत परतला. मात्र, त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलावले असता, तो बराकीत नसल्याचे उघड झाले. पसार झालेल्या भिंगारेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिस उपनिरीक्षक एन. सत्रे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. नीलेश घायवळ टोळीतील गुंड अटकेत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केल्यानंतर गेले आठ महिने पोलिसांना गुंगारा देणारा नीलेश घायवळ टोळीतील गुंडाला गुन्हे शाखेने अटक केली. गुरुदत्त गुणाजी साळवे (वय ४४, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कोथरूड पोलिसांनी घायवळ याच्यासह साथीदारांविरुद्ध आठ महिन्यांपूर्वी मकोका कारवाई केली होती. कारवाई केल्यानंतर साळवे पसार झाला होता. गेले आठ महिने तो गुंगारा देत होता. गुन्हे शाखेचे युनिट तीनचे पथक त्याच्या मागावर होते. साळवे सांगोला परिसरातील निजामपूर गावात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. साळवे याला कोथरूड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *