Headlines

जामखेडच्या कला केंद्रातील वादातून गर्भवती महिलेचा निर्घृण खून:पेट्रोल टाकून जाळले, चार आरोपी अटकेत, दोघे फरार




अहिल्यानगरच्या जामखेड येथील ‘सप्तसूर सांस्कृतिक कला केंद्रा’मधील अंतर्गत वादातून एका 31 वर्षीय गर्भवती महिलेची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत महिलेचे नाव पिंकी काटकर (मूळ रा. रायगड) असून, ती जामखेड येथील कला केंद्रात काम करत होती. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना बेड्या ठोकल्या असून, दोन आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पिंकी काटकर आणि कला केंद्रातील काही जणांसोबत अंतर्गत वाद झाला होता. या वादातून आरोपींनी आधी तिचे अपहरण केले. बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा येथील एका घरात तिला बेदम मारहाण करण्यात आली, ज्यामुळे ती बेशुद्ध पडली. ती मृत झाल्याचे समजून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी तिला चार चाकी गाडीत टाकले आणि राजस्थानकडे घेऊन चालले होते. वाटेत धुळे-सोलापूर महामार्गावरील गरताड बारी परिसरातील डोंगराळ आणि निर्जन भागात थांबून, आरोपींनी तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळले. 11 तास सीसीटीव्ही फुटेज तपासत पोलिसांचा उलगडा धुळे-सोलापूर महामार्गावरील गरताड बारी भागात एका महिलेचा जळालेला मृतदेह आणि जवळच ज्वलनशील पदार्थ सापडला होता. याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शवविच्छेदन अहवालात मृत महिला गर्भवती असल्याचे आणि तिला जाळून मारल्याचे समोर आले. मात्र, कोणतीही प्रत्यक्षदर्शी नसल्याने मृत महिलेची ओळख पटवणे मोठे आव्हान होते. धुळे पोलिसांनी कसून तपास करत महामार्गावरील तब्बल 11 तासांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. या तांत्रिक तपासात एक संशयास्पद कार आढळून आली. पुराव्यांच्या आधारे ही कार अहिल्यानगरमधील जामखेड येथून आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी थेट जामखेड गाठत ‘सप्तसूर सांस्कृतिक कला केंद्रा’मधून संशयितांना ताब्यात घेतले. यामध्ये
सरफराज उर्फ शफिक अलीम मोमीन, आरिफ उर्फ खुज्या आसीफ शेख, स्वाती उर्फ आरती गणेश कुऱ्हाडे
लक्ष्मी बालाजी पवार यांना ताब्यात घेण्यात आले आहे तर या प्रकरणातील इतर दोन आरोपी फारुख शेख आणि रोहिणी जाधव हे अद्याप फरार असून, पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. हे ही वृत्त वाचा सांगली जिल्हा बँकेसाठी महायुतीची जुळवाजुळव सुरू:प्रस्थापितांना हरवायचे असेल तर एकत्र लढा, मंत्री चंद्रकांत पाटलांची मित्रपक्षांना साद
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या निवडणुकीत प्रस्थापितांना पराभूत करायचे असेल, तर महायुतीमधील सर्व घटक पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवणे गरजेचे आहे, असे आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना केले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *