![]()
‘रवींद्र जावई असले तरी मी त्यांना मुलगा मानते…’ या भावनेतून अंतापूर येथील रखमाबाई खैरनार यांनी बेज (ता. कळवण) येथील जावई रवींद्र गांगुर्डे यांच्यासाठी स्वतःची किडनी दान केली. गेल्या २८ वर्षांपासून किडनीच्या आजाराशी झुंज देणाऱ्या रवींद्र यांना सासूच
.
रक्ताचे नाते नसतानाही जावयाला मुलाप्रमाणे मानून त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे कुटुंबीय भावूक झाले. आवश्यक वैद्यकीय तपासण्या, चाचण्या तसेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रत्यारोपण करण्यात आले. या उपचार प्रक्रियेत नेफ्रोलॉजिस्ट डॉ. प्रकाश उगले, युरोलॉजिस्ट सर्जन डॉ. प्रविण गोवर्धने, डॉ. किशोर वाणी तसेच किडनी ट्रान्सप्लांट समन्वयक चारुशीला जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
गेल्या २८ वर्षांपासून किडनीच्या आजारामुळे त्रास सहन करत होतो. प्रत्यारोपणाची वेळ आली तेव्हा कुटुंबीय चिंतेत होते. मात्र, माझ्या सासूबाईंनी स्वतःची किडनी देण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा त्याग आयुष्यभर विसरणार नाही. त्यांच्या त्यागामुळे मला नवजीवन मिळाले. – रवींद्र गांगुर्डे, बेज