![]()
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढवणारे अंबादास दानवे यांनी खळबळजनक आरोप केला आहे. कल्याण काळे, जगन्नाथ काळे, किरण पाटील डोणगावकर यांनाच महायुतीच्या पॅनलमधून उभे राहायचे होते. मात्र तसे झाले नाही.म्हणून काळेंनी स्वतंत्र पॅनल उभा केला,असा आरोप दानवेंनी केला. महाविकास आघाडीशी गद्दारी करणाऱ्या दानवेंची तक्रार आम्ही महाविकास आघाडीच्या वरिष्ठांकडे करणार आहोत, असे खासदार कल्याणकाळे यांनी सांगितले. स्वाभिमानासाठी लढलो, दानवेंनी शब्द फिरवला कल्याण काळे महाविकास आघाडीने स्वतंत्र पॅनलनिश्चित केला होता. त्यानुसार आम्हीउमेदवार देण्याचे ठरवलेहोते. काँग्रेसचे गेल्यावेळी ६ संचालक होते.त्यामुळे महायुतीनेआम्हाला जागा ठरवूनदेणे योग्य नव्हते. आम्हीस्वाभिमानाने निवडणूक लढवली. जनतेलापर्याय दिला. एकत्र निवडणूक लढवायचीठरलेली असतानाही दानवे यांनीमहायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला.त्याचा थेटपरिणाम निवडणुकीच्यानिकालावर झाला. आम्ही या संपूर्ण प्रकरणाची तक्रार मविआच्या वरिष्ठनेत्यांकडे करणार आहोत. महाविकास आघाडीत चर्चाचनाही : अंबादास दानवे याबाबत अंबादास दानवे म्हणाले की,खासदार कल्याणकाळे, जगन्नाथ काळे,किरण पाटीलडोणगावकर हे तीनजण महायुतीच्याशेतकरी पॅनलकडूननिवडणूक लढण्यास तयार होते. मात्रत्यांना केवळ दोन जागा देण्यात आल्याहोत्या. कल्याण काळे आणि जगन्नाथकाळे या दोन भावांत एकमत न झाल्यानेत्यांना इकडे येता आले नाही. महाविकासआघाडी असती तर महायुतीच्या इतक्याजागा बिनविरोध कशा आल्या. काँग्रेसनेतिथे काय केले, अशी प्रतिक्रिया दानवेयांनी दिली आहे. अध्यक्षांची लवकरच निवड बँकेच्या संचालकपदाचे निकाललागल्यानंतर पंधरा दिवसांत बँकेच्याअध्यक्षपदाची निवड प्रक्रिया केली जाते.त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारीविभागीय निबंधकांना अहवाल सादरकरतात. त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होते.पंधरा दिवसांच्या आत अध्यक्षाची निवडकेली जाते. त्यानुसार २० तारखेपूर्वीबँकेचा अध्यक्ष निवडला जाणार आहे.
Source link
जिल्हा बँकेच्या निकालानंतर दानवे-काळे यांच्यात कलगीतुरा:दानवेंची वरिष्ठांकडे तक्रार- काळे, ते महायुतीतूनच लढणार होते- दानवे