Headlines

जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची नाळ:छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित संचालक अनिल बोरसे यांचे प्रतिपादन‎




जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची नाळ असून बँक नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठीच काम करेल, असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित संचालक अनिल बोरसे यांनी केले. जिल्हा मध्यवर्ती बँकेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल फुलंब्री तालुक्यातील पिंपरी येथे ग्रामस्थांच्या वतीने मंगळवारी अनिल बोरसे यांचा सत्कार सत्कार करण्यात आला. या वेळी नायगावचे सरपंच जगन दाढे, माजी उपसरपंच आजिनाथ शेळके, रामेश्वर पवार, कृष्णा पवार, कैलास तायडे, रामदास बांबर्डे आणि रामदास देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. अनिल बोरसे म्हणाले की, जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याची संस्था आहे. माझी बिनविरोध झालेली निवड हा शेतकऱ्यांचा माझ्यावर असलेला विश्वास आणि उपकार आहेत. बँकेच्या प्रत्येक बैठकीत शेतकऱ्यांचे प्रश्न व मागण्या ठामपणे मांडणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा आणि अपघात विम्याचा प्रत्यक्ष लाभ कसा मिळवून देता येईल, यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे बोरसे म्हणाले. या वेळी माजी बाजार समिती संचालन सुनील तायडे, बाबासाहेब पवार, नारायण देवरे, अण्णा बांबर्डे, गणेश एरंडोले, प्रभाकर जंजाळ, दत्ता पवार, जगन्नाथ पवार, कैलास बांबर्डे, त्र्यंबक जंजाळ, शंकर पवार उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *