Headlines

नागपुरात आश्रमशाळेत विद्यार्थ्यावर शिपायाचा अनैसर्गिक अत्याचार:आरोपीला ठोकल्या बेड्या, पुसागोंदी येथील भटके विमुक्तांच्या आश्रमशाळेतील संतापजनक प्रकार



कोंढाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुसागोंदी येथील भटके विमुक्तांच्या निवासी आश्रमशाळेत शिपायाने एका विद्यार्थ्यावर १७ ऑगस्टला रात्री अनैसर्गिक अत्याचार केला, तर दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला; एका विद्यार्थिनीलाही ‘बॅड टच’ के

.

याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपी शिपायाला बेड्या ठोकल्या असून, त्याच्यावर ‘पोक्सो’, बाल न्याय अधिनियम, ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी तपास सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

पोलिसांची कठोर कारवाई

आरोपी शिपाई राजेश मुलचंद मालापुरे (४४) याच्याविरुद्ध पोक्सो कायदा कलम ४, ६ आणि १२, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम: कलम ७५, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याचे सांगण्यात आले आहे.

२६० विद्यार्थ्यांची चौकशी

गडचिरोलीच्या आश्रमशाळांमधील प्रकारांच्या पार्श्वभूमीवर नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एका विशेष तपास पथकाने आश्रमशाळेत तळ ठोकला असून, युद्धपातळीवर बयाण नोंदवण्याचे काम सुरू आहे.

दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न

या आश्रमशाळेत एकूण २४० मुले शिक्षण घेत असून, त्यापैकी १५० विद्यार्थी निवासी राहतात. यात १०२ मुले, ४८ मुलींचा समावेश आहे. शाळेत नाईट वॉचमन म्हणून काम करणारा राजेश मुलचंद मालापुरे (४४) याने एका विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केला आणि दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला. त्याने कसेबसे हात झटकून तिथुन सुटका केली. पीडित मुलाने धाडस करून हा सर्व प्रकार आश्रमशाळेच्या अधीक्षकांना सांगितला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *