Headlines

गेल्या पाच वर्षांत पुण्याच्या रस्त्यांवरसरासरी दर 28 तासांत एकाचा बळी:2021 पासून 6,500 अपघातांत झाला तब्बल 1,776 जणांचा मृत्यू




मेट्रो, उड्डाणपूल आणि रुंद रस्त्यांमुळे पुण्याचा चेहरा बदलत असला तरी सुरक्षित प्रवासाचे चित्र मात्र धूसर आहे. जानेवारी २०२१ ते १८ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाहतूक उपलब्ध आकडेवारीनुसार शहरात ६ हजार ५०० अपघात झाले असून १ हजार ७७६ जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजे पुण्याच्या रस्त्यांवर सरासरी प्रत्येक २८ तासांत एका व्यक्तीचा बळी जात आहे. २०२१ मध्ये शहरात ७४१ अपघात झाले होते. त्यातील २३९ प्राणघातक अपघातांत २५५ जणांचा मृत्यू झाला. २०२२ मध्ये अपघातांची संख्या ८७१, तर मृतांची संख्या ३२५ झाली. २०२३ मध्ये एकूण १ हजार २३० अपघात झाले आणि सहा वर्षांतील सर्वाधिक ३५१ मृत्यू नोंदवण्यात आले. २०२४ मध्ये सर्वाधिक १ हजार ४०३ अपघात झाले. त्यामध्ये ३४५ जणांना जीव गमवावा लागला. २०२५ मध्ये अपघातांची संख्या किंचित घटून १ हजार ३९२ झाली; मात्र ३०२ जणांचा मृत्यू झाला. २०२१ च्या तुलनेत २०२५ मध्ये अपघातांमध्ये तब्बल ८८ टक्के वाढ झाली. मृत्यूचे हे चक्र २०२६ मध्येही कायम आहे. रस्ता क्षमतेपेक्षा दुप्पट वाहने रस्त्यांच्या क्षमतापेक्षा दुप्पट ते दीडपट वाहने सध्या रस्त्यांवर आहेत. नेटवर्क नुसार ३० लाख वाहने अपेक्षित असताना त्यांची संख्या ८१ लाखापर्यंत पोहोचली आहे. दररोज १३०० नवीन वाहने रस्त्यांवर येत असल्याने वाहनांची मोठी वर्दळ सर्वत्र पाहावयास मिळत आहे. शहर वेगाने वाढत असताना वाहतुकीचे नियमन करण्यासाठी सध्या केवळ ११०० मनुष्यबळ आहे. आठ महिन्यांत ८३३ अपघात ऑगस्टपर्यंतच्या अहवालानुसार ८ महिन्यांत ८६३ अपघात आणि १९८ मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. त्यामध्ये १९६ प्राणघातक अपघातांचा समावेश आहे. तसेच ४४४ गंभीर अपघातांत ५३३ जण गंभीर जखमी झाले. नियमांचे पालन आवश्यक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर केवळ ११ टक्के आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अपघातांच्या ठिकाणांचा अभ्यास करून त्याठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे. नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होऊ शकेल. – मनोज पाटील, अपर पोलिस आयुक्त तत्काळ वैद्यकीय मदत रोजगार गमावण्याचेही संकट २०२१ पासूनच्या कालावधीत एकूण ३ हजार २३६ गंभीर अपघातांत ३ हजार ६९९ जण जखमी झाले. हे जखमी पुढे कायमचे अपंगत्व, उपचारांचा खर्च आणि रोजगार गमावण्याच्या संकटालादेखील सामोरे जातात वेगावर नियंत्रण आणि वैद्यकीय मदत प्रभावी झाली नाही तर पुण्याचा विकास वेगवान, पण प्रवास अधिक जीवघेणा ठरेल. पुण्यात खड्ड्याने घेतला मुलाचा जीव पुणे | रस्त्यांवरील खड्डे आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा एका निष्पाप जीवाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा आरोप होत आहे. पुण्यातील बालेवाडी-म्हाळुंगे परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात ११ वर्षीय ऋषभ संदीप पाटोळे याचा जागीच मृत्यू झाला. वडील, मुलगा आणि मुलगी दुचाकीवरून जात असताना रस्त्यातील मोठ्या खड्ड्यामुळे दुचाकी घसरली. त्यानंतर रस्त्यावर पडलेला ऋषभ मागून येणाऱ्या आयशर ट्रकच्या चाकाखाली आला. या दुर्घटनेचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरात संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, या प्रकरणी बावधन पोलिसांनी आयशर ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *