Headlines

विजेचा धक्का लागल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू:पिंपळगाव पेठ शिवारातील दुर्दैवी घटना‎




सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ शिवारात कपाशीच्या शेतात वखर हाकत असताना विद्युतप्रवाहाचा धक्का लागून बैलासह २२ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी संजय अंबादास फुले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास गट क्रमांक १०४ मध्ये ही हृदयद्रावक घटना घडली. या घटनेने पिंपळगाव पेठ परिसरात हळहळ व्यक्त होत असून, फुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संजय फुले हे मंगळवारी सायंकाळी आपल्या कपाशीच्या शेतात बैलजोडीच्या साहाय्याने वखर हाकत होते. शेताच्या बांधावर मोटारीसाठी टाकण्यात आलेली विद्युत वायर होती. वखर हाकत असताना अचानक बैलाचा पाय या विद्युत वायरमध्ये अडकला. वायरच्या संपर्कात येताच बैलाला जोरदार विजेचा धक्का बसला. त्याच वेळी संजय फुले यांचाही विद्युतप्रवाहाशी संपर्क आल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यांचा मृत्यू झाला.संजय यांचे अद्याप लग्न झालेले नव्हते. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे. तरुण मुलाचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, संजय फुले यांच्या पार्थिवावर मंगळवारी रात्री आठ वाजता पिंपळगाव पेठ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. कुटुंबावर दुखाचा डोंगर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *