![]()
मागील काही दिवसांपासून गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये कांद्याला कमाल ४५०० ते सरासरी ३४५१ रुपयांचा भाव मिळत असल्यामुळे तालुक्यासह परिसरातील शेतकरी दररोज ४०० ते ५०० वाहनांच्या माध्यमातून कांदा विक्रीसाठी आणत आहे. यासंदर्भात माहिती देताना सभापती अर्चना कृष्णा सुकासे यांनी सांगितले की, गंगापूर मार्केटमध्ये शेतकऱ्यांना मिळत असलेल्या समाधानकारक भावामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणत असून चालू हंगामात आतापर्यंत ५ लाख ६० हजार ३१६ क्विंटल कांद्याची खरेदी बाजार समितीच्या मार्केटमध्ये झाली आहे. १८ ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रात झालेल्या कांदा लिलावात उन्हाळी कांद्याला कमाल ४५०० किमान १००२ तर सरासरी ३४५१ रूपयांचा भाव मिळाला. उपसभापती सचिन काकडे, संचालक अप्पासाहेब हिवाळे, शेतकरी दादासाहेब बोडखे व शेतकरी उपस्थित होते. एप्रिल २०२६ या महिन्यात २८९९ शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी गंगापूर बाजार समितीमध्ये आणला होता. मे मध्ये ६७६१, जून १०६१२, जुलैमध्ये १०५१४, ऑगस्ट दि. १७ पर्यंत ५७६७ शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणला असून गंगापूर बाजार समितीमध्ये मागील काही महिन्यांपासून इतर ठिकाणच्या तुलनेत मिळत असलेला भाव व सुविधांमुळे गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसोबतच अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा, घोडेगाव, वैजापूर, येवला तालुक्यातील अनेक शेतकरी वाहनांद्वारे कांदा विक्रीसाठी आणत आहे. भाव कायम असावा. शेतकऱ्यांत समाधान : ^गंकांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून सध्याच्या भावामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीला सावरण्यास आधार मिळत आहे. -दादासाहेब बाळासाहेब बोडखे, रा. बगडी, शेतकरी
Source link
गंगापूर बाजार समितीमध्ये कांद्याला प्रति क्विंटल 4500 रुपयांचा भाव:दररोज 500 वाहनांची गर्दी; शेजारी नेवासा, येवला तालुक्यातून येतोय कांदा