Headlines

‘मॉडेल यूएन’मध्ये संजीवनीच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय भरारी..!:ग्वाल्हेरच्या राष्ट्रीय परिषदेत 18 विद्यार्थ्यांचा सहभाग‎




ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथील ॲमिटी युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित ‘मॉडेल युनायटेड नेशन्स (एमयूएन) राष्ट्रीय परिषद २०२६’मध्ये संजीवनी अकॅडमीच्या १८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली. प्रभावी वक्तृत्व, आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे आकलन, चिकित्सक विचार आणि राजनैतिक कौशल्याच्या जोरावर विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर संजीवनी अकॅडमीचे नाव उज्ज्वल केले. दोन दिवसीय या राष्ट्रीय परिषदेत देशभरातील नामांकित शाळा व महाविद्यालयांमधील सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ‘महाभारत’ संकल्पनेवर आधारित स्पर्धेत जान्हवी पटेल, विहान दहिकर, कार्तिक चांदगुडे, आरोही कुलकर्णी व प्रियांशु हिरे यांनी ‘संयुक्त राष्ट्र महिला स्थिती आयोग’ (यूएनसीएसडब्ल्यू) विषयावर प्रभावी मांडणी करत विशेष प्रावीण्य मिळविले. तसेच वीरा कोठारी, पलक बोधक, देवाशिष शेंडगे, ओवी आघाव, अथर्व टिळेकर व श्रीहर्ष थेटे यांनी ‘महाभारत’ संकल्पनेवर आधारित स्पर्धेत सहभाग घेतला. यूएनसीएसडब्ल्यू संकल्पनेत राजवी शर्मा, शर्विल खैरनार, सुरभी कोकणे, सई कुंभार, गार्गी शूल, श्रेयसी गायकवाड व संविदा जोशी यांनी सहभाग नोंदविला. या यशाबद्दल संजीवनीचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. डॉ. आर. एस. शेंगडे, डॉ. सुधांशु भट, सुधा सुब्रमण्यम, अनुश्रीता सिंग आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी प्रभावी वक्तृत्वासोबतच आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे आकलन, चिकित्सक विचार, नेतृत्वगुण आणि राजनैतिक कौशल्य दाखविले. पाठ्यपुस्तकाबाहेरील ज्ञान, जागतिक घडामोडींची जाणीव आणि आत्मविश्वासाने विचार मांडण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळावी, हा आमचा प्रयत्न आहे, असे संजीवनी अकॅडमीच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *