Headlines

टाकळी ग्रामपंचायतीच्या वतीने दहावीतील गुणवंतांचा सत्कार:सिध्दी सोलाटे हिने शाळेतून ९४. २० टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा बहुमान मिळवला




प्रतिनिधी | ढोरकीन पैठण तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामस्थांच्या वतीने येथील विठ्ठल- रखुमाई मंदिरात दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ होऊन त्यांना नवप्रेरणा मिळावी यासाठी या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. यामध्ये विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झालेल्या सिध्दी सोलाटे हिने शाळेतून ९४. २० टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. तर भक्ती वाघ हिने ९३. २० टक्के, अनुष्का सोलाटे ९१.२० टक्के तर ऋषाली सोलाटे हिने ९१ टक्के गुण घेतले आहे. त्याचप्रमाणे सायली जाधव, साईनाथ गोरे, रुद्रप्रताप भालेकर, प्रशांत जाधव, दिपाली सुसे, गौरी ठोकळ, आकाश जाधव, रितेश लाटे, तनुजा गोरे, कार्तिक जाधव व अंजली कातबने या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून पुढील शैक्षणिक वाटचीलीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संत एकनाथ साखर कारखान्याचे माजी संचालक विजय गोरे, माजी सरपंच गंगाधर जाधव, व्हा. चेअरमन आप्पासाहेब ठोंबरे, माजी चेअरमन सखाराम सोलाटे, भानुदास लाटे, माजी उपसरपंच तथा सुसे अर्बन पतसंस्थेचे चेअरमन कडुबाळ सुसे, उपसरपंच चंद्रहार लाटे, माजी उपसरपंच रघुनाथ जाधव, माजी उपसरपंच कडुबाळ जाधव, आसाराम ठोंबरे, निजाम शेख, बाबुराव शिंदे, गुलाम शेख, शिवनाथ जाधव, सुरेश जाधव, संतोष सोलाटे, नितीन जाधव, आप्पासाहेब जाधव, मच्छिंद्र लाटे, अमोल सोलाटे, बबन निळ, किरण सोलाटे, दिगंबर घावट, दिपक लाटे, योगेश सोलाटे, रवींद्र लाटे, रामेश्वर लाटे, धर्मराज गोरे, कृष्णा लाटे व कलिम सय्यद यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. टाकळी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *