Headlines

टाकळी ‎जिवरग परिसरातील‎ विहिरी, लघुप्रकल्प कोरडेच:पिण्याच्या पाण्यासह चाराटंचाईची भीती, बळीराजाचे डोळे ढगांकडे




टाकळी जिवरग जुलै महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाला तरी सिल्लोड तालुक्यातील टाकळी जिवरगसह कायगाव, गव्हाली आणि तलवाडा परिसरात समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद झाले आहे. मान्सूनचे आगमन होऊन बराच कालावधी उलटला तरी अनेक भागांतील विहिरी आणि लघुप्रकल्प अजूनही कोरडेच असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. लघुप्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने जलसाठ्यांची पातळी अत्यंत खालच्या स्तरावर पोहोचली आहे. अनेक प्रकल्प तर पूर्णपणे कोरडे पडले आहेत. भूगर्भातील पाणीपातळीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. शेतकऱ्यांच्या विहिरींनी तळ गाठल्याने खरीप पिकांना संरक्षण देणेही आता कठीण झाले आहे. शेतीसोबतच आता पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र होऊ लागली आहे. ग्रामीण भागात महिलांना हंडाभर पाण्यासाठी मैलोन् मैल भटकंती करावी लागत आहे. स्थानिक जलस्रोत शेतकरी पुन्हा दुबार पेरणीच्या उंबरठ्यावर पावसाच्या दीर्घ खंडामुळे खरिपातील पिके सुकू लागली आहेत. अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढवले असून, आगामी काळात जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा ताण पडला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *