Headlines

Increasing exports from India will reduce trade deficit


  • Marathi News
  • National
  • Agenda For Talks With China: Increasing Exports From India Will Reduce Trade Deficit

मुकेश कौशिक11 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

जिनपिंग ७ वर्षांनंतर भारतात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत त्यांची बैठकही होईल. २०२० चा गलवान संघर्ष व एलएसीवरील ४ वर्षे चाललेल्या तणावानंतर प्रथमच दोन्ही नेते भारतात बसून संबंधांची नवी जमीन निश्चित करतील. दोन्ही देश एलएसीपासून व्यवसायापर्यंत ६ आघाड्यांवर काम करत आहेत.

२५ ऑगस्टला बीजिंगमध्ये एनएसए अजित डोवाल व चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात विशेष प्रतिनिधींच्या २५ व्या फेरीतील चर्चेत ८ मुद्द्यांवर सहमती झाली होती. महत्त्वाचा निर्णय सीमावादावर तज्ज्ञ गट स्थापनेचा आहे. दोन्ही देश सीमेवर २ अतिरिक्त लष्करी संपर्क केंद्रे बनवण्यावर व पूर्व व मध्य सेक्टरमध्ये २ लष्करी हॉटलाइन स्थापनेवर सहमत आहेत. याला आता हिरवा कंदील मिळेल.

भारताचे मुद्दे : फार्मा व कृषीसारख्या सेक्टर्समध्ये चिनी बाजारपेठेत प्रवेश

भारताच्या मालाला चिनी बाजारपेठेत जास्त प्रवेश मिळावा. सप्लाय चेन राजकीय तणावापासून अलिप्त राहावी. फार्मा, आयटी व कृषी उत्पादनांसह अनेक क्षेत्रांत भारत चीनकडे उत्तम बाजारपेठ प्रवेशाची मागणी करत आहे. बैठकीत आर्थिक असमतोल कमी करण्यासाठी संस्थात्मक व्यवस्था निर्माणावर चर्चा शक्य. गलवान वादानंतर चिनी गुंतवणुका मंजुरीच्या बंधनात; सुरक्षा तपासणीसह कारखान्यांमधून रोजगार, तंत्रज्ञान,आयात घटवण्यावर भारत विचार करत आहे.

चीनची इच्छा: सीमावाद संपण्यापूर्वीच बाकीचे द्विपक्षीय संबंध खुले करा

चीनची इच्छा आहे की सीमावाद द्विपक्षीय संबंधांपासून वेगळा राहावा. व्यापार व इतर क्षेत्रांतील संबंध वाढत राहावेत. भारताची भूमिका यापेक्षा वेगळी आहे. सीमेवर असामान्य स्थिती असेल तर बाकीचे संबंध सामान्य होऊ शकत नाहीत. व्यावहारिक मार्गाचा फॉर्म्युला असा असू शकतो-एलएसीवर मजबूत लष्करी सुरक्षा यंत्रणा बनावी. सीमा निश्चितीची प्रक्रिया पुढे जावी.

१०५ छोट्या रशियन विमानांची डील शक्य, उत्पादन भारतातच

अनिरुद्ध शर्मा . नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी व रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात शुक्रवारी बैठक होईल. संरक्षण व अणुऊर्जेनंतर भारत-रशिया नागरी विमान वाहतुकीत भागीदारीच्या तयारीत आहेत. रशियन विमान उत्पादक युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन (यूएसी) ने विमानांच्या विक्रीसोबत निर्मिती, तंत्रज्ञान हस्तांतरण, एमआरओ व स्थानिक उत्पादनाचा प्रस्ताव दिला आहे. दिल्लीतील इन्नोप्रोम इंडिया एक्स्पोमध्ये यूएसीने आयएल-११४-३००, एसजे-१०० व एमसी-२१ प्रवासी विमाने सादर केली. यूएसी पिनेकल एअरसोबत ५०, एअर केरलासोबत २० आणि स्लीक एव्हिएशनसोबत ३५ आयएल-११४-३०० विमानांच्या कराराच्या तयारीत आहे. एसजे-१०० च्या भारतातील उत्पादनासाठी एचएएलसोबत परवाना कराराची प्रक्रिया सुरू आहे.

ब्रिक्सला विकासाचे पूरक इंजिन बनवणार भारत

शनिवारपासून नवी दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषद. शी आणि पुतीन यांच्यासह ११ देशांचे नेते येतील. यूएन, डब्ल्यूटीओ प्रमुखही असतील. भारत ग्लोबल साऊथसाठी ब्रिक्सला विकासाचे पूरक इंजिन बनवेल; अन्न, ऊर्जा सुरक्षा व सप्लाय चेन मुख्य अजेंडा आहेत. पश्चिम आशियातील संकटावर इराण-यूएई मतभेदांमुळे नवी दिल्ली घोषणेवर एकमत झालेले नाही. ब्रिक्समध्ये निर्णय सहमतीने होतात. पंतप्रधान मोदी आज इराणचे राष्ट्राध्यक्ष पझेशकियान यांचीही भेट घेतील.

ब्रिक्समध्ये येणार चिनी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग, गलवाननंतरचा पहिला भारत दौरा फाइल फोटो बीजिंग | चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग १२-१३ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होतील. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी याला दुजोरा दिला. प्रवक्त्याने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निमंत्रणावरून जिनपिंग परिषदेत सहभागी होतील. ते यापूर्वी २०१९ मध्ये चेन्नईजवळील मामल्लपुरम येथे मोदींसोबतच्या अनौपचारिक शिखर बैठकीसाठी भारतात आले होते. ते २०१६ मध्ये गोव्यात ब्रिक्स परिषद व सप्टेंबर २०१४ मध्येही भारतात आले आहेत. २०२० च्या गलवान संघर्षानंतर हा त्यांचा पहिला भारत दौरा आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *