Headlines

ठाकरे गटातील वाद पुन्हा चव्हाट्यावर!:नार्वेकर कोण लागून गेला? भास्कर जाधवांचा संताप; मिलिंद नार्वेकरांचाही खोचक टोला




शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांच्या बंडखोरीच्या चर्चांदरम्यान आता पक्षातील अंतर्गत मतभेदही उघडपणे समोर येऊ लागले आहेत. आमदार भास्कर जाधव आणि विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यातील शाब्दिक चकमकीमुळे ठाकरे गटातील वाद पुन्हा चर्चेत आला आहे. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात झालेल्या शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिन कार्यक्रमादरम्यान भास्कर जाधव माध्यमांशी संवाद साधत असताना मिलिंद नार्वेकर यांच्या वाहनाचा हॉर्न वारंवार वाजल्याने जाधव संतापले. “नार्वेकर कोण लागून गेला? ही पद्धत बरोबर नाही. ते आमचे नेते असले म्हणून काय झालं?” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. जाधवांच्या संतापानंतर मिलिंद नार्वेकरांचा टोला यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी ‘एक्स’वर हा व्हिडिओ शेअर करत उपरोधिक प्रतिक्रिया दिली. “माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उद्धवजींच्या पत्राची लवकरात लवकर अंमलबजावणी करा; कारण यांच्या मानसिक त्रासाचा फटका आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना बसत आहे,” असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याच मुद्द्याचा संदर्भ घेत नार्वेकरांनी जाधवांवर अप्रत्यक्ष टीका केल्याचे मानले जात आहे. या घडामोडींमुळे ठाकरे गटातील अंतर्गत नाराजी आणि गटबाजी पुन्हा एकदा उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पावसाळी अधिवेशनास सुरुवात: विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून शिवरायांना अभिवादन पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. सुरुवातीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. दुसरीकडे, विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे अशा घोषणा दिल्या जात आहेत. वाचा लाइव्ह अपडेट्स



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *