Headlines

ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार:दोन राऊंड फायर, प्रकृती चिंताजनक




ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी पूर्णेकर यांच्यावर दोन राऊंड गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. गोळीबाराची घटना कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हल्ल्यामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. दोन राऊंड गोळीबार प्राथमिक माहितीनुसार, प्रदीप पूर्णेकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी दोन राऊंड फायर केले. गोळीबारानंतर पूर्णेकर गंभीर जखमी झाले. हल्लेखोरांनी नेमका कोणत्या कारणातून हा हल्ला केला, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. गोळीबारानंतर जखमी प्रदीप पूर्णेकर यांना तातडीने ठाण्यातील इन्फिनिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. पोलिसांकडून तपास सुरू घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून हल्ल्याचा नेमका घटनाक्रम समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. परिसरातील CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून प्रत्यक्षदर्शींची माहिती घेतली जात आहे. हल्लेखोर किती जण होते, त्यांनी कोणत्या वाहनाचा वापर केला आणि गोळीबारामागे नेमके कारण काय आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. संशयितांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती किंवा हल्ल्यामागील कारण स्पष्ट झाल्यानंतर पुढील तपशील समोर येण्याची शक्यता आहे. हेही वाचा…. माजी अग्निवीरांना शासकीय नोकरीत आरक्षण:कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांची निर्मिती; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय राज्यातील 256 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने राज्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणीपुरवठा आणि विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, दुष्काळ जाहीर न झालेल्या उर्वरित तालुक्यांमधील शेतकऱ्यांनाही दिलासा व मदत देण्याच्या अनुषंगाने या बैठकीत महत्त्वपूर्ण विचारविनिमय झाला. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *