![]()
अमरावती येथील डफरीन रुग्णालयात २४ ऑगस्ट रोजी आग लागली. यात तीन लहान मुलांचा जीव गेला. या घटनेनंतर सरकारने चौकशी समिती नेमून अहवाल मागवला. मात्र, हा अहवाल एकांगी असून कुणाला वाचवायचे आणि कुणाला गोवायचे हे आधीच ठरले होते, असा आरोप माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी गुरुवारी केला. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी अहवाल सार्वजनिक करण्याचे आश्वासन दिले होते, पण तो जाहीर झाला नाही. डॉ. देशमुख यांनी अहवाल मिळवून त्यातील त्रुटी माध्यमांसमोर मांडल्या. त्यांच्या मते, आरोग्य सचिव आणि आयुक्त यांना वगळले, तर फायर सेफ्टी व इलेक्ट्रिक कामांच्या कंत्राटदारांचा अहवालात उल्लेखही नाही. डॉ. देशमुख यांनी पुरावे म्हणून पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आणि व्हिडिओ सादर केले. फायर सेफ्टी व इलेक्ट्रिक कामांचा कंत्राट पुणे येथील शुभम ईपीसी प्रा. लि. कंपनीला मिळाला होता. प्रत्यक्षात इलेक्ट्रिकचे काम मनोज ठक्कर यांनी, तर फायर सेफ्टीचे काम रंजन नायर यांनी केले, असे त्यांनी सांगितले.
Source link
डफरीन रुग्णालयाच्या आग चौकशी अहवालावर माजी मंत्र्यांचा संशय:कुणाला वाचवायचे अन् कुणाला गोवायचे हे आधीच ठरले होते, डॉ. सुनील देशमुख यांचा आरोप