![]()
ग्रामपंचायतीचे रहिवासी दाखला तयार करुन बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय योजनांचा लाभ घेतल्या प्रकरणी एकाविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोपीने शिधा पत्रिका, जातीचा दाखला तयार केल्याचे उघडकीस आले. याबाबत अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या पोलीस उपअधीक्षक सई भोरे-पाटील यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी ज्ञानेश्वर बबन शेळके (रा. म्हाळुंगे, ता. मुळशी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्यातील कोलतावडे ग्रामपंचायचीचे सरपंच आणि विठ्ठल मारुती शेळके यांनी अनुसुचित जमाती प्रमाणपत्र समितीकडे तक्रार अर्ज दिला होता. आरोपी कोलतावडे गावचे रहिवासी नसून, त्यांनी विठ्ठल शेळके यांच्या कुटुंबातील पुरावे जोडून जातीचा दाखल, वैधता प्रमाणपत्र मिळवले होते. तक्रार अर्जाची पडताळणी करण्यासाठी समितीने हे प्रकरण २४ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलीस दक्षता पथकाकडे हस्तांतरित केले होते. चौकशीत शेळके याने कोलतावडे गावातील ८ अ उतारा बनावट तयार केला होता. बनावट शिक्क्यांचा वापर करुन रहिवासी दाखला तयार केला होता. त्याचा वापर करुन शिधापत्रिका, जातीचे प्रमाणपत्र मिळवले होते. विठ्ठल शेळके यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या शालेय आणि महसूल नोंदीचा वापर केला. ५ मार्च २०२६ रोजी अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र मिळवले होते. या समितीने सुनावणी घेऊन याबाबतचा अहवाल १९ जून २०६ रोजी समितीस सादर केला. त्यानंतर समितीने सुनावणी घेऊन २२ सप्टेंबर रोजी निर्णय दिला. आरोपी ज्ञानेश्वर शेळके याने बनावट कागदपत्रांच्या आधारे महादेव कोळी अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवल्याचे चौकशीत उघडकीस आले. आरोपीचा महादेव कोळी अनुसुचित जमातीचा दावा अवैध ठरविण्यात आला. अनुसुचित जाती तपासणी समितीने याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले, तसेच त्याचा दाखला रद्द आणि जप्त करण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक मोरे तपास करत आहेत.
Source link
बनावट कागदपत्रांनी शासकीय योजनांचा लाभ घेतला:ज्ञानेश्वर शेळकेवर गुन्हा दाखल, ग्रामपंचायतीचा बनावट दाखला वापरून मिळवले जातीचे प्रमाणपत्र