Headlines

डॉक्टरांसोबत परिचारिकांचेही योगदान अमूल्य- हरिष वाघमारे:कुकाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक परिचारिका दिन साजरा‎




“आरोग्य व्यवस्थेत रुग्णांना बरे करण्यात डॉक्टरा इतकीच परिचारिकांची भूमिकाही अत्यंत महत्त्वपूर्ण असते. सेवाभाव, संयम, तत्परता आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर परिचारिका संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचा भक्कम आधारस्तंभ बनल्या आहेत. त्यामुळे समाजाने त्यांच्या अखंड सेवेचा आणि कार्याचा गौरव करणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते हरिष वाघमारे यांनी केले. कुकाणे (ता. नेवासा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक परिचारिका दिन मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. आधुनिक नर्सिंगच्या जनक तथा ‘लेडी विथ द लॅम्प’ म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर कुकाणे येथील सरपंच लताबाई अभंग, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दहिफळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीमती करडे मॅडम, डॉ. डिंबर, डॉ. कानडे, डॉ. कुलदीप पवार आणि डॉ. बाफना मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. कानडे यांनी आपल्या मनोगतातून फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या सेवाभावी जीवनप्रवासाचा आणि कार्याचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. उपस्थित इतर मान्यवरांनीही परिचारिकांच्या अहोरात्र चालणाऱ्या रुग्णसेवेचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. परिचारिकांचा विशेष सन्मान फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून कुकाणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व परिचारिका भगिनींना पेन व सदिच्छा भेटकार्ड देऊन गौरविण्यात आले. कोरोना काळापासून ते आजतागायत ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सक्षम ठेवण्यात परिचारिकांचा मोठा वाटा असल्याचे मान्यवरांनी यावेळी अधोरेखित केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *