![]()
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांच्यावरील हल्ला आणि पाच लाख रुपयांच्या खंडणी प्रकरणात ‘बिग बॉस’फेम दिव्या सुनील शिंदे हिच्या पोलिस कोठडीत बुधवारी (३० सप्टेंबर) २ ऑक्टोबरपर्यंत वाढ झाली. १७ जणांचा सहभाग आहे. हल्ल्यासाठी आठ दुचाकी वापरल्याचे निष्पन्न झाले. हल्ल्यातील हत्यारे, मोबाइल फोन व डिजिटल पुरावे जप्त करणे बाकी असल्याने पोलिसांनी दिव्या शिंदेच्या कोठडीत वाढ मागितली. पोलिसांनी ‘ब्लू नाईल’ हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज घेतले. त्यात आप्पा ढमढेरे, डॉ. गायकवाड व त्यांच्या मुलामध्ये पाच लाखांच्या खंडणीबाबत बैठक झाल्याचा पोलिसांनी दावा केला. आप्पा ढमढेरे (पिंपरी), निखिल शिंदे, त्याची पत्नी आणि ताहीर (कोंढवा) यांच्यासह १३ अनोळखी व्यक्तींचा यात सहभाग आहे. दिव्या शिंदे तपासात सहकार्य करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि डॉ. गायकवाड यांच्या हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींची माहिती समोर आली आहे. आठ दुचाकींवरून हे आरोपी घटनास्थळी आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तपास पथकाने ‘ब्लू नाईल’ हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये आप्पा ढमढेरे, डॉ. गायकवाड आणि त्यांच्या मुलामध्ये पाच लाख रुपयांच्या खंडणीबाबत बैठक झाल्याचे दिसून येत असल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला. तपासात आप्पा ढमढेरे (रा. पिंपरी), निखील शिंदे, निखीलची होणारी पत्नी, ताहीर (रा. कोंढवा) यांच्यासह अन्य १३ अनोळखी व्यक्तींचा सहभाग निष्पन्न झाल्याचे सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे यांनी न्यायालयात स्पष्ठ केले. पोलीस कोठडीत वाढ झाल्याने दिव्य शिंदे हिच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे
Source link
डॉ. गायकवाड हल्ला प्रकरणी दिव्या शिंदेची कोठडी वाढवली:खंडणी प्रकरणात 17 जणांचा सहभाग, हल्ल्यासाठी 8 दुचाकी वापरल्या