Headlines

ड्रायव्हिंग लायसन्ससाठीच्या परीक्षेत 75% गुण मिळवावे लागतील:यापूर्वी 60% गुण आवश्यक होते, ऑनलाइन नाव-पत्ता बदलण्यासाठी शुल्क आकारले जाणार नाही




तुम्हाला नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे असल्यास, आता परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी 75% गुण मिळवावे लागतील. यापूर्वी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान 60% गुण आवश्यक होते. रस्ते वाहतूक मंत्रालयाने लायसन्स काढण्यासाठी नवीन नियमांचा मसुदा तयार केला आहे. यानुसार किमान 30 मिनिटांचे ‘सेफ-ड्रायव्हिंग ट्युटोरियल’ पाहणे आणि त्यानंतर परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असेल. याशिवाय, आधार पडताळणीद्वारे ऑनलाइन मिळणाऱ्या काही सेवांचे शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा प्रस्तावही सरकारने दिला आहे. यामध्ये कार्डवरील नाव, पत्ता बदलण्यासारख्या सेवांचा समावेश आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *