![]()
मध्य रेल्वेवर सोमवारी सलग दोन तांत्रिक बिघाडांमुळे तब्बल ९ तास वाहतूक खोळंबली. लाखो चाकरमान्यांचे हाल झाले. दुसरीकडे लोकल ठप्प झाल्याने भांडुपजवळ रुळावरून चालणाऱ्या एका तरुणाला एसी लोकलने चिरडले. यामुळे ६० हून अधिक फेऱ्या रद्द झाल्या, तर रस्त्यावर पर्यायी वाहनांअभावी रिक्षाचालकांनी प्रवाशांची आर्थिक लूट केली. सकाळी ९:२३ वाजता मुलुंड-ठाणे मार्गावर ओव्हरहेड वायरवर तार पडली. हे काम सुरू असतानाच ९:३३ ला कांजूरमार्ग केबिनमध्ये शॉर्टसर्किटने आग लागून भांडुप-विक्रोळीदरम्यानची सिग्नल यंत्रणा ठप्प झाली. सुरक्षिततेसाठी गाड्या थांबवल्या. अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी प्रवाशांना ३ तास रखडावे लागले. काहींनी थेट ट्रॅकवरून पायपीट केली. याचदरम्यान भांडुपजवळ एका तरुणाला एसी लोकलने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी ६:१८ वाजता वाहतूक पूर्ववत झाली. रिक्षावाल्यांचे ‘भाडे-अस्त्र’ आणि लूट रेल्वेच्या गोंधळामुळे पर्यायी वाहतुकीचा फज्जा उडाला. बस थांब्यांवर लांब रांगा लागल्याचा गैरफायदा घेत रिक्षा-टॅक्सी चालकांनी मनमानी केली. ठाणे ते घाटकोपरदरम्यान नेहमीच्या भाड्याऐवजी प्रत्येकी २०० ते ३०० रुपये उकळण्यात आले. प्रशासनाची भूमिका कांजूरमार्ग येथील रिले पॅनलमध्ये आग लागल्याने सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. मॅन्युअल पद्धतीने गाड्या पुढे काढल्या. सायंकाळपर्यंत सर्व सिग्नल पूर्ववत झाले. गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत. -डॉ. स्वप्निल नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे फॅक्ट शीट : ९ तास गोंधळ: सकाळी ९:२३ ते सायंकाळी ६:१८ वाजेपर्यंत. ६० फेऱ्या रद्द: सिग्नल यंत्रणा ठप्प झाल्याने ६ मार्गांना फटका. मॅन्युअल चालन : ‘टीडी ९१२’ प्राधिकरणाद्वारे ताशी १०-१५ किमी वेगाने गाड्या धावल्या. अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी प्रवासी ३ तास ताटकळले ठाणे स्थानकावर सकाळी १० वाजेपासून प्रवासी लोकलच्या प्रतीक्षेत असताना संध्याकाळी रेल्वे कर्मचाऱ्यांना घेऊन कल्याणकडे जाणारी विशेष लोकल फलाट क्रमांक २ वर उभी होती. ती रिकामी असतानाही कर्मचाऱ्यांनी डब्याचे दरवाजे आतून बंद केले होते. प्रवाशांनी गयावया करूनही प्रतिसाद न दिल्याने एका संतप्त प्रवाशाने बंद दरवाजावर पाण्याची बाटली फेकून निषेध नोंदवला. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आक्रमक होत सर्वसामान्यांच्या करातून पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची अरेरावी खपवून घेणार नाही, असे म्हटले.
Source link
तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या 60 फेऱ्या रद्द; मुंबईकर ‘रुळा’वर:ट्रॅकवर उतरलेल्या तरुणाचा लाेकलच्या धडकेत मृत्यू