Headlines

ताडोबाचे गाइड आता इंग्रजीसह जर्मनही बोलणार:91 देशांतील 3.89 लाख पर्यटकांनी भेट दिली; 20,939 विदेशी पर्यटक




ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात परदेशी पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता ताडोबाचे गाइड आंतरराष्ट्रीय पर्यटकांशी त्यांच्या भाषेत संवाद साधण्यासाठी तयार होत आहेत. मागील वर्षात ९१ देशांतील २०,९३९ विदेशी पर्यटकांसह एकूण ३ लाख ८९ हजार ७०० पर्यटकांनी ताडोबाला भेट दिली. विदेशी पर्यटकांचा वाढता ओघ पाहून ताडोबा प्रशासनाने गाइडना इंग्रजीसोबत जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. २ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान १४ महिला गाइडना इंग्रजी संभाषणाचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर १७ ते २७ ऑगस्ट दरम्यान मोहली आणि मदनापूर येथे ४२ गाइडना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे गाइड पर्यटकांना त्यांच्या भाषेत ताडोबाची जैवविविधता समजावून सांगू शकतील. या प्रशिक्षणामध्ये संवादकौशल्य, आदरातिथ्य, वन्यजीव व्यवस्थापन यांचाही समावेश आहे. एकूण ३५९ गाइडना प्रशिक्षण दिले आहे. वाढत्या पर्यटनामुळे पर्यावरणीय समतोल राखण्याचे आव्हानही महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *