Headlines

तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली:मूल होत नसल्याच्या टोमण्यांना कंटाळून आयटी इंजिनिअर तरुणीची आत्महत्या, पुण्यामध्ये पती, सासूसह नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल




सिंहगड रस्ता परिसरातील माणिकबाग येथे एका २७ वर्षीय संगणक अभियंता तरुणीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दीप्ती प्रदीप एकशिंगे असे या मृत तरुणीचे नाव असून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती आणि सासूसह नातेवाइकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीप्ती ही मूळची गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी गावाची रहिवासी होती. पुण्यात एका माहिती-तंत्रज्ञान (आयटी) कंपनीत काम करत असताना तिची ओळख प्रदीप एकशिंगे याच्याशी झाली. एकत्र काम करताना त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि १७ नोव्हेंबर २०२४ रोजी दोघांनी पुण्यात प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर काही काळातच मूल होत नसल्याच्या कारणावरून सासरच्यांनी दीप्तीचा छळ करण्यास सुरुवात केली. तिला वारंवार टोमणे मारले जात होते. सासरच्या या सततच्या मानसिक त्रासाला आणि जाचाला कंटाळून दीप्तीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आपले आयुष्य संपवले, असे दीप्तीचे भाऊ डॉ. किरण तुषार दूधबळे (३०) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेमुळे सिंहगड रस्ता परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. डॉ. दूधबळे यांच्या तक्रारीवरून सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात पती प्रदीप विठ्ठल एकशिंगे, सासू सुरेखा आणि इतर नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्त एसीपीकडून सुनेचा छळ; शारीरिक संबंधांची मागणी केल्याचा विवाहितेचा आरोप निवृत्त सहायक पोलिस आयुक्ताने आपल्या सुनेचा मानसिक आणि शारीरिक छळ करत तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी विवाहितेचा पती, सासू आणि नणंदांकडूनही मारहाण व त्रास दिल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी ३० वर्षीय विवाहितेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार निवृत्त एसीपी सुरेश रामचंद्र घाडगे, त्यांचा मुलगा विक्रांत घाडगे, पत्नी सुनंदा घाडगे, नणंद स्नेहल सर्जेराव, प्रवीण सर्जेराव, वैशाली राऊत आणि विक्रम राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या वडिलांची मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागातून उपसचिव पदावरून निवृत्ती झाली आहे. त्यांच्या मित्रामार्फत विक्रांत घाडगे यांचे स्थळ आले होते. नोव्हेंबर २०२१ मध्ये विमाननगर येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये साखरपुडा पार पडला, तर एप्रिल २०२२ मध्ये सासवड येथे विवाह झाला. साखरपुडा आणि विवाहाचा सर्व खर्च तसेच मोठ्या प्रमाणात सोने-चांदीचे दागिने मुलीच्या पालकांकडून देण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *