- Marathi News
- National
- 16 More Reservoirs In Critical Category In 42 Days, Goa Mumbai Have Only A Month’s Supply, Water Cut Begins In Mumbai
नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

देशाच्या अनेक भागांत मान्सूनचा वेग मंदावलेला असताना प्रमुख जलाशयांची स्थिती सातत्याने खालावत चालली आहे. केंद्रीय जल आयोग (सीडब्ल्यूसी) च्या १८ जूनच्या अहवालानुसार सामान्य साठवणुकीच्या ८०% किंवा त्यापेक्षा कमी पाणी असलेल्या जलाशयांची संख्या एका महिन्यात ३७ वरून वाढून ४४ झाली आहे. तर ४२ दिवसांत आणखी १६ जलाशय गंभीर श्रेणीत पोहोचले आहेत. यामुळे ५०% या त्यापेक्षा कमी सामान्य साठवणूक असलेल्या जलाशयांची संख्या ११ वरून वाढून २५ वर पोहोचली आहे. याचे गंभीर परिणामही दिसायला सुरुवात झाली आहे. गोव्यात एका महिन्याचा, तर मुंबईत ४० दिवसांपेक्षा कमी पाणी शिल्लक राहिले आहे. यामुळे मुंबईत पाणी कपातही सुरू केले.
मुंबईत नवीन बांधकाम प्रकल्पांना पाणी जोडणी देण्यावर बंदी घातली आहे व बांधकाम ठिकाणांचे तात्पुरते कनेक्शन तातडीच्या प्रभावाने निलंबित केले आहेत. शहरातील सर्व स्विमिंग पूलचा पाणीपुरवठा बंद केला आहे. वाहने धुणे, बागकाम व रस्त्यांच्या सफाईमध्ये पिण्याच्या पाण्याच्या वापरावर बंदी घातली आहे. रेल्वे, नौदल, एचपीसीएल, बीपीसीएल आणि औद्योगिक प्रतिष्ठानांना प्रक्रियेत आणलेले पाणी वापरणे बंधनकारक केले आहे.
यांचा आदर्श… आंध्रचे शेतकरी नव्या तंत्राने प्रति एकर १२ लाख लिटर पाणी वाचवतात
आंध्र प्रदेशात संभाव्य कमकुवत मान्सून आणि एल निनोचा प्रभाव पाहता शेतकरी भातशेतीमध्ये डायरेक्ट सीडेड राइस (डीएसआर) तंत्रज्ञान अवलंबत आहेत. या पद्धतीमध्ये भाताची रोपवाटिका तयार करून लावणी करण्याऐवजी बिया थेट शेतात पेरल्या जातात. यामुळे शेतात सतत पाणी भरून ठेवण्याची गरज पडत नाही व प्रति एकर १२ लाख लिटर पाण्याची बचत होते. या प्रक्रियेत सहभागी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की डीएसआरमुळे सिंचनाचा खर्च आणि मजुरीचा खर्चही कमी होतो, तर जल संकटाच्या स्थितीत शेती अधिक शाश्वत बनते.
पूर्व क्षेत्रात २०.८९%, पश्चिम क्षेत्रात २९.२०% पाणी
- क्षेत्रनिहाय आकडेवारीनुसार दक्षिण भारताची स्थिती सर्वात दबावाखाली आहे, जिथे जलाशयांचा साठा साठवण क्षमतेच्या तुलनेत केवळ २१.३४% राहिला. पूर्व क्षेत्रात हा २०.८९% व पश्चिम क्षेत्रात २९.२०% आहे.
- देशाचा एकूण साठा अजूनही १० वर्षांच्या सरासरीपेक्षा जास्त आहे, परंतु गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत तो केवळ ८६.६२% राहिला आहे, जे जलाशयांवर वाढत्या दबावाचे संकेत मानले जात आहे.
- देशातील १६६ प्रमुख जलाशयांमध्ये एकूण जलसाठा घटून ५०.४६ अब्ज घनमीटर (बीसीएम) राहिला आहे, तर २१ मे रोजी हा ६०.८३ बीसीएम होता. म्हणजेच एका महिन्यात जलसाठा १०.३७ बीसीएम कमी झाला व साठवणूक क्षमतेच्या प्रमाणात पाणीपातळी ३३.१४% वरून घटून २७.४९% वर पोहोचली.
- चार जलाशय पूर्णपणे कोरडे: मे महिन्याच्या सुरुवातीला देशात एक जलाशय शून्य साठवणुकीच्या स्थितीत होता, तर १८ जूनपर्यंत अशा जलाशयांची संख्या वाढून चार झाली आहे. बिहारचा चंदन डॅम, महाराष्ट्रातील भीमा-उज्जनी, उत्तर प्रदेशातील मौदाहा आणि उत्तराखंडचा नानक सागर पूर्णपणे कोरडे पडले.