![]()
तोंडापूर परिसरात ४०० ड्रम आणि कित्येक ट्रक भरून घातक, विषारी रसायने नाल्यात फेकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हे रसायन जमिनीत मुरण्यासाठी खड्डा करून त्यातही साठा ओतला आहे. हा नाला पुढे वाघूर नदीला मिळत असल्याने खडकी, ढालगाव आणि जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर प्रकल्पातील पाणी दूषित होऊन ५ लाख नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. हा प्रकार जुलै २०२५ पासून सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले. ज्या नाल्यात रसायन सोडण्यात येत आहे. जामनेर तहसील च्या महसूल पथकाने घटनास्थळी धाव घेत पाच वेगवेगळ्या ठिकाणी पंचनामे केले. हा अहवाल तहसीलदारांकडे सादर केला जाणार असून, पुढील कारवाई जळगाव प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सोपवण्यात आली आहे.
Source link
तोंडापूर परिसरात 400 ड्रममध्ये घातक रसायन:वाघूर प्रकल्पातील पाणी दुषित होण्याचा धोका