Headlines

दगडूशेठ ट्रस्टच्या 'जय गणेश सेवालयाचे' भूमीपूजन:मंदिराशेजारी गणेश भक्तांसाठी विविध सेवा उपलब्ध होणार




श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने गणेश मंदिराशेजारी ‘जय गणेश सेवालयाचे’ भूमीपूजन नुकतेच पार पडले. या सेवालयाच्या माध्यमातून मंदिरात येणाऱ्या लाखो गणेश भक्तांसाठी विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या भूमीपूजन सोहळ्यास ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जय गणेश सेवालय ही पाच मजली वास्तू मंदिराशेजारील जागेत साकारण्यात येत आहे. यामध्ये भाविकांसाठी स्वच्छतागृह, लहान मुले व मातांसाठी स्तनपान केंद्र, लगेज काउंटर, चप्पल स्टँड, सुरक्षा केंद्र, मोबाईल डिपॉझिट काउंटर, प्रशासकीय कार्यालय, इन्फॉर्मेशन सेंटर आणि प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या सेवालयाचे काम पुढील तीन महिन्यांत पूर्ण करण्याचा संकल्प आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवानिवृत्तांचे धरणे आंदोलन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांपासून निवृत्ती वेतन मिळाले नसल्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून आज पुण्यात धरणे आंदोलन करण्यात आले. भीषण उन्हाळ्यात वयोवृद्ध कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येत असल्याने तात्काळ पेन्शन तत्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. म.जी.प्रा. कर्मचारी संघर्ष कृती समितीच्या वतीने राज्यातील सर्व कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी शासनाकडे निवेदन सादर करून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली. हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठविण्यात आले आहे. तसेच म.जी.प्रा. च्या मुकह्या अभियंता वैशाली आवटे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष एस. डी. देशपांडे, उपाध्यक्ष स. सी. आलेकर , कार्याध्यक्ष ए. जी. देशमुख, अरुण निर्भवणे, गजानन गटलेवार, ए. जी. देशमुख, सरचिटणीस संजय केळकर, डी . के. इनामदार, प्रिया माळी, श्रीकांत राऊत यांच्यासह शेकडो निवृत्त कर्मचारी , अभियंते उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *